शिरुर तालुक्यात पोलीस पाटील पदासाठी २४१ रिंगणात

शिरुर, ता.२८ जून २०१७ (सतीश केदारी) : शिरुर तालुक्यात पोलीस पाटील पदांसाठी झालेल्या छाणणीत २० अर्ज अपाञ ठरले असुन २४१ उमेदवार रिंगणात आहेत. याबाबत संबंधित विभागाशी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

शिरुर तालुक्यात पोलीस पाटील पदासाठी नुकताच निवडीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला. त्यानुसार आरक्षण सोडत जाहिर करण्यात आली व अर्ज मागविण्यात आले होते. शिरुर तालुक्यातुन सुमारे २६१ अर्ज प्राप्त झाले. यावेळी झालेल्या छाणणीत २० अर्ज अपाञ ठरले. त्यामुळे २४१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले यांना प्रत्यक्ष भेट घेउन अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, तहसिलदार भोसले यांनी 'पार्किंग'मध्ये यादी लावली आहे, तिथुन घ्या' अशा प्रकारचे उत्तर दिले. यानंतरही तहसिलदार भोसले व उपविभागीय अधिकारी भाऊ गलंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

गांवनिहाय प्राप्त अर्ज पुढीलप्रमाणे-
नागरगाव-२५, टाकळी भिमा-१४, बाभुळसर खुर्द-६, डिंग्रजवाडी-१३, चिंचोली-२१, दरेकरवाडी-७, आलेगाव पागा-५, वाजेवाडी-९, शिरसगाव काटा-४, रांजणगाव सांडस-५, जांबुत-१४, खैरेवाडी-९, वाडा पुनर्वसन-१, मिडगुलवाडी-४, सणसवाडी-५, शास्ताबाद-५, रांजगाव गणपती-२, निमगाव म्हाळुंगी-२,वढु बु.-५, धानोरे-१, फाकटे-१, बुरुंजवाडी-११, आरणगाव-१, पिंपरखेड-२, आंबळे-१५, कान्हुर मेसाई-७, कर्डेलवाडी-९, हिवरे-२, खंडाळे-७, गुनाट-२, उरळगाव-२, गोलेगाव-४, बाभुळसर बु.-२, करडे-२, जातेगाव खुर्द-२, भांबर्डे-२, चांडोह-१, कवठे येमाई-२, खैरेनगर-६, करंदी-१.

उर्वरित गावांबाबत  सविस्तर माहिती प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मिळू शकली नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या