राज्यात शिष्यवृत्ती परीक्षेत दिक्षा गायकवाड प्रथम

टाकळी भिमा, ता. २९ जुन २०१७ (जालिंदर आदक) :  येथील जिल्हा परिषद शाळेतील इ.५वी शिष्यवृत्ती परीक्षेत दीक्षा संतोष गायकवाड हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत टाकळी भिमा येथील ग्रामीण भागातील मुलगी राज्यात झळकल्याने अनेकांचा शुभेच्छाचे वर्षाव झाले असून, शाळेतील ऐतिहासिक यश प्राप्त झाले आहे.  २६ विद्यार्थ्यांपैकी राज्य गुणवत्ता यादीत २ तर जिल्हा गुणवत्ता यादीत १६ विद्यार्थी आले आहे

गुणवत्ता यादीत २८८ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक दिक्षा गायकवाड हिने पटकावला आहे, तसेच राज्यात पाचवा विराज लोखंडे हा आला आहे.

जिल्हा गुणवत्ता यादीतील आलेले विद्यार्थी :  आम्रपाली जाधव–२७०, अमृता साकोरे २७०, हर्षदा मोरे -२६६, वैभवी जाधव -२६०, प्रदिप पाटोळे -२५८, नम्रता साकोरे -२५०, भाग्यश्री काळे -२४४, अंकिता ढिले-२४०, सुवर्णा जाधव–२३४, मयूर डांगे-२३०, पूजा  राऊत-२३०,  सरीता कांबळे-२४४, वेदांत वडघुले-२१८,  सोहम अडागळे-२१६, अथर्व माहुलकर-२१६, अजिंक्य साकोरे-२१२

टाकळी भिमा ता. शिरूर जि.पुणे हे तसं बागायती क्षेत्रातील गाव शेतीच्या कामामुळे पालकांना आपल्या पाल्याकडे तसं जास्त लक्ष देता येत नाही तरीही रुपाली लोखंडे या शिक्षकेने इ.५ वीच्या मुलांच्यात प्रचंड इच्छाशक्ती निर्माण केली व त्यास दररोजचे सकाळी ९ ते सांयकाळी ७ अशी जबरदस्त कष्टाची जोड देत जि.प.प्राथ.शाळा टाकळी भिमा शाळेच्या आजपर्यंतच्या इतिहासातील शिष्यवृत्ती परीक्षेचा उच्चांक गाठला व शाळेचे नाव राज्यात उज्ज्वल केले
  
प्रचंड कष्ट जबरदस्त इच्छाशक्ती व नियोजनबद्ध अध्यापनतंत्र हेच या यशाचे रहस्य असल्याचे रुपाली लोखंडे या शिक्षिकेने  सांगितले. गावातील ग्रामस्थांनी फटाके वाजवून हा आनंद साजरा केला. या यशात विशेष मार्गदर्शक मुख्याध्यापक संजय गायकवाड,  केंद्र्प्रमुख राजेंद्र टिळेकर,  विस्तार अधिकारी वंदना शिंदे तसेच सर्व सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पाटोळे, मिलिंद गायकवाड, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी विध्यार्थी व शिक्षकांचे तोंडभरून कौतुक केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या