डॉ. आंधळेनी केल्या 80 मुलींच्या मोफत प्रसुती (Video)

शिरुर, ता. २९ जुन २०१७ (सतीश केदारी) : शिरुर तालुक्यात मुलगी वाचवा अभियानाला बळकटीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती डॉ. सतीश आंधळे यांनी www.shirurtaluka.comशी बोलताना दिली.शिरुर येथील डॉ. सतीश आंधळे व अर्चना आंधळे यांनी गेल्या वर्षभरात शिरुर तालुक्यातील  सुमारे ८० मुलींच्या मोफत प्रसुती केल्या आहेत. या अभियानाबाबत त्यांना नुकताच पुरस्कार मिळाला आहे. या वेळी झालेल्या परिषदेत जिल्हास्तरावर अशा प्रकारचा प्रयोग राबविण्याचे सुचविण्यात आले. त्यानुसार शिरुर तालुक्यात विविध विभागांना सोबत घेउन लेक वाचवा अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती डॉ.आंधळे यांनी दिली.

यासाठी डॉक्टर व आरोग्यसेविका यांची नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली असुन, त्यानुसार व्यापक प्रमाणात ही मोहिम राबविली जाणार आहे. बेटी बचाओ अभियानाला बळकटीकरणासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या