व्हर्लपुल कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी खेडकर

रांजणगाव गणपती, ता. २९ जुन २०१७ (प्रतिनीधी) : येथील  व्हर्लपूल इंडीयाच्या कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी पिंपरी दुमाला (ता. शिरूर) येथील कैलास खेडकर यांची तिसऱयांदा बिनविरोध निवड झाली.

रांजणगाव येथे राजू थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कामगारांच्या बैठकीत  संघटनेच्या पदाधिकाऱयांची निवड करण्यात आली. यावेळी कंपनीचे अधिकारी एच. बी. एन. रेड्डी, महेंद्र पाटील, दिपक पाटील आदी उपस्थित होते. निवडीनंतर श्री खेडकर आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

कंपनीत 180 कामगार कायमस्वरूपी असून मार्च 2017 मध्ये प्रत्येक कामगारांना 38 हजार 500 रुपये बोनस देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आगामी काळातही असाच बोनस देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. कंपनी व्यवस्थापन, अधिकारी व कामगार यांच्यात सुसंवाद व समन्वय साधून कामगारांच्या हिताचे निर्णय घेणार असून, कोणत्याही कामगारांवर अन्याय होणार नाही याची दखल संघटनेतर्फे घेतली जाईल, असे आश्वासन श्री. खेडकर यांनी यावेळी दिले.

संघटनेची इतर कार्यकारिणी पुढील प्रमाणे :  उपाध्यक्ष-विकास वारे, जनरल सेक्रेटरी- दादाभाऊ थिटे, सह सेक्रेटरी- मारूती नाणेकर, कार्याध्यक्ष- संजय गवळी, खजिनदार- बापू दसगुडे, सह खजिनदार- अशोक भोसले. सदस्यः हनुमंत कुंभार, सुभाष मोहिते, संभाजी जामदार, दत्तात्रेय लांडे, विवेक खंडाळे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या