'त्या' बेपत्ता इसमाचे गुढ कायम

शिक्रापूर,ता.१ जुलै २०१७(विशेष प्रतिनीधी) :  धामारी (ता. शिरूर) येथील बेपत्ता इसमाचा शोध लागला नसताना बेपत्ता झालेली गाडी एका मृतदेह सापडली परंतु त्या गाडीमधील मृतदेह त्या बेपत्ता इसमाचा नसल्याने याबाबत गुढ निर्मान झाले आहे.

सविस्तर माहिती अशी कि,(धामारी ता. शिरूर) येथून वीस जुलै रोजी शिवाजी भिकोबा डफळ हे त्यांच्या एम एच १२ एन ई ४८७१ या वाहनाला दोन अज्ञात इसमांनी भाडे ठरवून नेले होते परंतु त्या नंतर ते अद्याप परतले नव्हते. त्याचा शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या इसमाचे नातेवाईक देखील त्याचा शोध घेत होते.दरम्यान अचानक लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भिमा नदीच्या कडेला झाडांमध्ये एम एच १२ एन ई ४८७१ या क्रमांकाचे वाहन आणि त्यामध्ये संपूर्ण जळालेला एक मृतदेह असल्याची माहिती पोलीसांना समजली. यांनतर लोणीकंद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, शिक्रापूर पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे यांसह आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी बेपत्ता झालेले वाहन जळलेले दिसले. आणि त्यामध्ये एक मृतदेह देखील आढळून आला तर मृतदेह इतक्या जास्त प्रमाणात जळालेला आहे कि त्याची ओळख पटणे देखील शक्य नाही.

परंतु यावेळी संपूर्ण जळलेल्या स्थितीमध्ये असलेला मृतदेह नातेवाईकांनी पहिला परंतु या मृतदेहाच्या तोंडातील दातावरून हा मृतदेह आमच्या बेपत्ता इसमाचा नसल्याचे त्यांनी सांगितले व बेपत्ता शिवाजी डफळ यांना खाली दात नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले, त्यामुळे सर्व पोलीस चक्रावून गेले. यांनतर हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे. या घटनेमागे नेमके काय कारण असू शकते याचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास शिक्रापूर व लोणीकंद पोलीस करत आहे.

दरम्यान या बेपत्ता व्यक्तीबाबत गुढ वाढले असुन पोलीस कसुन तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या