शिक्रापुरात महिलेवर बलात्कारप्रकरणी एकवर गुन्हा

शिक्रापूर,ता.१ जुलै २०१७(विशेष प्रतिनीधी) : येथे महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत तिला गर्भधारणा झाल्याने दोनवेळा गर्भपात केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळची नागपूर येथील घटस्पोटीत व पिडीत महिलेचे नऊ वर्षापूर्वी लग्न झालेले होते, त्यानंतर सहा वर्षापूर्वी या महिलेला तिचे पतीपासून मुलगा देखील झाला. परंतु सदर महिलेचा पती नेहमीच दारू पीत असल्याने व त्याची वर्तवणूक चांगली नसल्याने त्याने वारंवार भांडण होत होते. त्यामुळे दोघांनी देखील स्वखुशीने घटस्पोट घेतला. यांनतर सदर पिडीत महिला शिक्रापूर येथे राहण्यास आली आणि सणसवाडी येथील एका कंपनीत कामाला जाऊ लागली. यावेळी कंपनीतील अतुल काळजकर याचेशी या महिलेची ओळख झाली आणि काही दिवसांनी त्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. यांनतर दीड वर्षापासून त्याने मी तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून या पिडीत महिलेशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले.

त्यामुळे या महिलेला दोन वेळा गर्भधारणा देखील झाली परंतु सदर महिलेस गर्भधारणा झाली असल्याचे समजल्याने अतुल याने मला हे मुल नको आहे असे म्हणून दोन वेळा शिक्रापूर येथील एका रुग्णालयात तिचा गर्भपात केला. यांनतर पिडीत महिलेची फसवणूक झाली असल्याचे तिच्या लक्षात आल्याने तिने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी अतुल रामकृष्ण काळजकर (रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे मूळ राहणार अडगाव ता. माशी जि. अमरावती) याचे विरुद्ध बलात्कार तसेच फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला परंतु सदर आरोपी हा फरार झालेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले हे करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या