शिरूरला दोन कामगार मृतावस्थेत आढळले (Video)

शिरूर, ता.१ जुलै २०१७ (विशेष प्रतिनीधी) :  येथील रामलिंग रोडलगत  असणा-या स्वामी टाईल्स या सिमेंटचे ब्लॉग  बनविणा-या कंपनीतील कामासाठी बाहेरगावावरुन आलेल्या  दोन मजुरांचा  संशयास्पदरिता मृत्यू झाला असून, एका जणावर उपचार सुरु असल्याची माहिती शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिली.या बाबत शिरूर पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार, रामलिंग रोड वर स्वामी टाईल्स ही सिमेंटचे ब्लॉग  बनविणारी कंपनी असून ३० जून रोजी  मधुकर भउजी सोळंखी याने (मनमाड, जिल्हा. नाशिक) येथील पाकीजा नाका येथून सुनील भाऊराव गजभिये (वय ३०, रा. जामदी, ता.कारंजा, जि. अकोला) यासह दोन मजुरांना(नावे व माहिती समजु शकली नाही) कंपनीत कामासाठी शिरुर येथे  घेवून आले होते.

शुक्रवार (ता. ३० जून) रोजी कंपनीच्या शेजारी असणा-या राहत्या घराच्या शेडमध्ये सुनील हा चपात्या बनवीत होता तर त्याच्या समवेत आलेले दोन मजूर हे गावातून भाजी व जेवण बनविण्याचे साहित्य आणायला गेले होते. आल्यानंतर दोघांनी म्हसूर डाळ व सोयाबीनची भाजी बनविली. यानंतर  तिघांनी यावेळी देशी दारू चे सेवन केले व तिघेही जेवण करून झोपायला गेले.

त्यानंतर सुनील गजभिये याला रात्री झोपेत असताना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर सुनील याने इतर दोघा मजुरांना उठविण्याचा प्रयत्न केला परंतु ते उठले नाही. ते दोघे झोपेत असावे म्हणून तो परत झोपी गेला. आज(ता.१) रोजी सकाळी ठेकेदार व त्याचा भाऊ उठविण्यास आले असता दोघे मजूर उठले नाही.म्हणून  सदर मालकाने डॉक्टरला बोलविले असता दोन पैकी एकाने उलटी केल्याचे दिसले. डॉक्टरांनी वैद्यकितय तपासणी केल्यानंतर ते दोघे मृत्यू पावल्याचे सांगितले.

मयत झालेला एका मजुराचे वय ५२ व दुस-यांचे ४२ असावे असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला असुन या दोन्ही मजुरांचा ओळखी संदर्भात कोणतेही ओळखपत्र मिळू न शकल्याने त्याची ओळख पटू शकली नाही.तर यातुन वाचलेला सुनील वर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहे.तसेच दोघांच्या मृत्युचे कारण माञ समजु शकले नाही.

या  घटनेसंदर्भात शिरुर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यु म्हणुन नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. आर. धोंगडे हे करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या