कारेगाव ला भरदुपारी महिलेवर बलात्कार

कारेगाव,ता.४ जुलै २०१७(विशेष प्रतिनीधी) : येथील फलके मळा येथे भाडेकरु म्हणुन राहत असलेल्या महिलेवर भरदुपारी बलात्कार केल्याची घटना घडली.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार,रविवार(ता.२) रोजी दुपारी १२: ३० च्या सुमारास पिडित महिला ही घरामध्ये स्वयंपाक करीत असताना यातील आरोपी हा रुममध्ये भाडे घेण्यासाठी आला.व भाडे देण्याची मागणी करु लागला.यावर संबंधित महिलेने १५ तारखेपर्यंत देते असे सांगितले.तरीही आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.यानंतर आरोपीने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली.महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपीने दमदाटी करुन महिलेवर अत्याचार केला.यानंतर संबंधित घटनाही महिलेने पतीस फोनद्वारे सांगितली.  

या बाबत रांजणगाव पोलिसांनी  संकेत भाऊसाहेब नवले (रा.फलकेमळा,कारेगाव) यावर बलात्कार व अट्राँसिटी कायद्या अतर्गंत गुन्हा दाखल केला असुन आरोपीला राञी उशिरा अटक केली असल्याचे पोलीसांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या