शिरुर ग्रामीणच्या उपसरपंचपदी विठ्ठल घावटे

शिरुर,ता.१४ जुलै २०१७(सतीश केदारी) : शिरुर ग्रामीण (रामलिंग) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी विठ्ठल गणपत घावटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शिरुर ग्रामीण ग्रामपंचायत च्या पदाधिका-यांच्या बैठकित प्रत्येक सदस्याला काम करण्याची संधी मिळण्यासाठी उपसरपंच बाबाजी वर्पे यांनी ठरल्यानुसार राजीनामा दिला.त्यानुसार रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी घावटे यांचाच अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी बी.डी.बेंद्रे यांनी घावटे यांना बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

या वेळी शिरुर हवेलीचे  आमदार बाबुराव पाचर्णे बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले कि,शिरुर शहराचे उपनगर म्हणुन शिरुर ग्रामीण ची मोठी झपाटयाने वाढ होत आहे.विकासाच्या दृष्टीने १६ कोटींची पाणीपुरवठा, रस्ते, वीज मुलभुत सोयी-सुविधा निर्माण करणे हे आव्हान असुन त्या दृष्टीने विकासात्मक पावले उचलणे गरजेचे असल्याने नवनियुक्त पदाधिका-यांना याचे योग्य नियोजन करुन प्रस्तावित कामे पुर्णत्वास नेण्यासाठी अधिकारी व पदाधिकारी यांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे.यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी या वेळी बोलताना दिले.

या निवडीवेळी पं.स.सदस्य आबासो सरोदे,सरपंच ताराबाई चाबुकस्वार, मावळते उपसरपंच बाबाजी वर्पे, माजी सरपंच अरुण घावटे, मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे,माजी पं.स.सदस्य दादापाटील घावटे, नगरसेवक संदिप गायकवाड,मंगेश खांडरे, माजी नगरसेवक प्रवीण दसगुडे, समता परिषदेचे किरण बनकर,उदयोजक आप्पासो जाधव, तर्डोबाच्या वाडीचे सरपंच वर्षा काळे, उपसरपंच संभाजी कर्डीले, माजी उपसरपंच संजय शिंदे, नामदेव जाधव, दिनकर साबळे, नितीन बो-हाडे, संजय घावटे, शिवाजी महाजन, रामदास जामदार, बाळासो दौंडकर, शिवाजी दसगुडे, गौतमराव घावटे, कुंडलिक दसगुडे, प्रमिला कापरे, मिरा दसगुडे, रंजना लोंढे, सरस्वती घावटे, व सर्व ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते.

शिरुर ग्रामीण ग्रामपंचायत ही डेव्हलमेंट क्लस्टर च्या दृष्टीने अत्यंत महत्वाची समजली जात असुन शिरुर पंचक्रोशीत नगरपालिकेनंतर सर्वाधिक महत्त्वाची व आर्थिक उत्पन्न देणारी ग्रामपंचायत ओळखली जात आहे.त्यामुळे या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या