...अन संपुर्ण सभागृहच हास्यात बुडाले !

करडे, ता.१५ जुलै २०१७ (सतीश केदारी) : सध्या आखाड सुरु असुन सर्वञ मसालेदार व मांसाहारी जेवणाच्या जेवणावळी सुरु आहे.अनेक ठिकाणी आखाड पार्ट्या रंगत असल्याचे चिञ दिसुन येत आहे.करडे(ता.शिरुर) येथे न्हावरे-शिरुर ग्रामीण गटाचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील यांनी आढावा बैठकिचे आयोजन केले होते.

यावेळी दोन सञात गटातील सर्व गावांचा गावनिहाय आढावा घेण्यात आला.सकाळचे सञ संपल्यानंतर दुपारी भोजनाचे जगदाळे पाटील यांनी  आयोजन केले होते.दुपारी जेवणानंतर दुपारचे सञ सुरु करण्यात आले.जेवणानंतर अनेकांनी सुग्रास जेवणाची पावतीच जगदाळे पाटील यांना दिली.याचाच धागा पकडत  भाषणाची सुरुवात केल्यानंतर बोलताना जगदाळे पाटील म्हणाले कि, अनेकांच्या चेह-यावर मला समाधानाचे भाव दिसुन येत असुन सभा जास्त वेळ चालली असली तरी चुळबुळ माञ झाल्याचे जाणवले नाही.जेवणानंतर जेवण छान झाल्याचे सांगितले असले तरी आज गुरुवार असल्याने शाकाहारी जेवणाचा बेत आखला होता.

सध्या आखाडाचा महिना सुरु आहे म्हणुन काहींनी आखाडाचाच बेत असायला हवा होता असे म्हटले.परंतु मासवडीतील मास हे मासे व मांस असल्याचे मानुनच आखाड साजरा झाला आहे असे समजावे असे जगदाळे पाटील यांनी म्हणताच संपुर्ण सभागृहच हास्यात बुडुन गेले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या