सीमेवरील जवानांसाठी विद्यार्थिनींनी पाठवल्या राख्या

विठ्ठलवाडी, ता.३० जुलै २०१७(सुनिल भोंगळ) : येथील श्री पांडुरंग विद्यामंदिरातील १८२ विद्यार्थिनींनी सिमेवर असणाऱ्या  जवानांसाठी २३२ राख्या पाठवून शुभेच्छा संदेश दिला.

विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्यामंदिरातील विद्यार्थीनीचे रक्षाबंधनानिमित्त जवानांसाठी राख्या पाठविण्याचे हे द्वितीय वर्ष आहे. या विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या एकूण १८२ विद्यार्थीनीनी एकत्रित निधी संकलित करून राख्या खरेदी केल्या.विठ्ठ्लवाडीचे माजी सरपंच,सेवानिवृत्त कॅप्टन लोभाजी आल्हाट व शिरूर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पांडुरंग विद्यामंदिरात या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्याध्यापक आर.एस.नजन, जेष्ठ शिक्षक एस.जी.थोरात व सर्व शिक्षक–शिक्षकेतर वृंद, विद्यार्थी उपस्थित होते .यावेळी सेवानिवृत्त कॅप्टन लोभाजी आल्हाट यांना शालेय विद्यार्थीनिनी राखी बांधून, भारत मातेच्या सीमेवर लढणाऱ्या आपल्या जवान बंधूना राख्या पाठविण्यासाठी सुपूर्त केल्या.

सीमेवर लढणाऱ्या जवानांना बहिणीची आणि राखीची कमतरता भासू नये  आणि देश रक्षणाबरोबर बहिणीच्या रक्षणासाठी हा प्रमाचा धागा विद्यार्थिनींनी पाठवला त्याचबरोबर त्यांनी शुभेच्छा संदेश जवानांपर्यंत पोहचविला.यावेळी आल्हाट यांनी सांगितले कि स्पीड पोस्टाच्या माध्यमातून तुम्ही अथक परीश्रमातून आणलेल्या राख्या रक्षाबंधनापुर्वी पोहचणार आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या