शिरूर तालुका.कॉमवरून यापुढे Live Video....

शिरूर, ता. 1 ऑगस्ट 2017 (सतीश केदारी/तेजस फडके): राज्यात शिरूर तालुक्याचे प्रथम संकेतस्थळ बनविण्याचा मान मिळविणारे www.shirurtaluka.com नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवून एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहे. संकेतस्थळावरून यापुढे Live Video दाखविले जाणार आहेत.

www.shirurtaluka.com  या संकेतस्थळाचे 26 मे 2011 रोजी मंत्रालयात माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तेंव्हापासून संकेतस्थळ एक-एक पाऊल पुढे टाकून नवनवीन उपक्रम राबवित आहे. वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळेच हे शक्य आहे.

जगभरात सोशल नेटवर्किंगने अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. नेटिझन्सचा नेटवर्किंगला मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे अनेकजण सोशल नेटवर्किंगसह ऑनलाइन माध्यमाकडे वळले असल्याचे दिसून येत आहे. संकेतस्थळ यापुढे Live Video दाखवून एक पाऊल पुढे टाकत आहे. संकेतस्थळाचे फेसबुकवरील विविध पेजसचे 40 हजार लाइक्स व 750 हून अधिक व्हॉट्सऍपग्रुप आहेत. यामुळे शिरूर तालुक्यातील कोणताही Live कार्यक्रम नेटिझन्सना तालुक्यातील एखाद्या वस्तीवरून ते जगाच्या कोणत्याही कोपऱयातून पाहता येणार आहे.

शिवाय, शिरूर तालुक्यातील विविध भागांमध्ये विविध घडामोडी घडत असतात. अनेकजण विविध Video तयार करून ते Whatsappच्या माध्यमातून शेअर करताना दिसतात. परंतु, तो व्हिडिओ कोणी व कोठे शुट केला आहे, हे कळत नाही. यामुळे कितीही चांगला व्हिडिओ असला तरी तो किती जणांनी पाहिला व कोणी तयार केला हे समजू शकत नाही. यामुळे तुमच्या भागातील व्हिडिओ तुमचे नाव व माहितीसह आमच्या shirurtaluka@gmail.comवर पाठवा. संबंधित व्हिडिओ तुमच्या नावासह आमच्या फेसबुकवर व संकेतस्थळावर अपलोड केला जाईल.

  • शिरूर तालुक्यातील कार्यक्रम Live संकेतस्थळावरून दाखविले जातील. (उदा. विविध सभा, गणेश मंडळांचे देखावे, दहीहंडी, गावांमधील विविध कार्यक्रम....)
  • शिरूर तालुक्यातील नेटिझन्सनी पाठविलेले व्हिडिओ संकेतस्थळावर ठेवले जातील.
  • संकेतस्थळावरील Videoला वाचकांचा मोठा प्रतिसाद

आपल्या Live कार्यक्रमांसाठी आमच्या प्रतिनिधींशी आजच संपर्क साधा-
सतीश केदारी- 8805045495 / 9403734322
तेजस फडके- 9766117755 / 9049685787

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या