इनामगाव चे संजय सातव झाले डीवायएसपी

इनामगाव,ता.३ अॉगस्ट २०१७(सतीश केदारी) : येथील संजय पंढरीनाथ सातव यांची नुकतीच उपविभागीय पोलीस अधिकारी  या पदावर नियुक्ती झाल्याने परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे.

ग्रामीन भागातुन हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जात शिक्षण घेतलेले संजय सातव हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणुन लोहमार्ग पोलीस स्टेशन पुणे येथे कार्यरत होते.

सातव यांनी अतिशय हलाखीच्या परीस्थीतीत ग्रामीण भागात शिक्षण पूर्ण करुन बी एस सी अॅग्री शिक्षण पूणे येथील कॄषी महाविदयालय येथे घेतले. दरम्यान त्यांनी एम पी एस सीची परीक्षा दिली. व त्यातुन त्यांची थेट पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. यानंतर त्यांनी मूंबर्इ शहारामध्ये मालाड, दहिसर, बांद्रा त्याचबरोबर विशेष शाखा, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, गुप्तवार्ता विभाग या ठिकाणी 20 वर्ष काम पाहिले.

मूंबर्इ शहरामध्ये कापूरबावडी, डोंबिवली, नारकोली या ठिकाणी 7 वर्ष आपल्या कामाच चांगलाच ठसा उमटवला.तसेच पुणे व ठाणे लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले हे सर्व काम पाहता त्यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बढती मिळुन नागपूर येथे नियूक्ती झाली.सातव यांना उपविभागीय अधिकारी पदी निवड झाल्यामुळे मिळाल्यामुळे शिरूरच्या पूर्वभागातील इनामगावासह इतर गावामध्ये सातव यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या