पदवीधर नाव नोंदणीला मुदतवाढ देण्याची नामुष्की

कोंढापुरी,ता.४ अॉगस्ट २०१७(प्रतिनीधी): पदवीधर नावनोंदणी प्रक्रियेला तिस-यांदा मुदतवाढ देण्याची पुणे विद्यापीठावर नामुष्की आली असल्याची माहिती पुणे जिल्हा युवक कॉंग्रेस चे प्रवक्ते व सरचिटणीस किशोर गायकवाड यांनी दिली.

पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले कि, सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अधिसभेच्या(सिनेट) निवडणुक प्रक्रीयेतील पहिल्या टप्या मध्ये नाव नोंदणी प्रक्रीया १२ जुन २०१७ ते ११ जुलै २०१७ या कालावधीमध्ये करण्यात आली. परंतू विद्यापीठाने घातलेल्या जाचक नियम व अटींमुळे ह्या प्रक्रीयेला अतीशय अल्प प्रतीसाद मिळाला.युवक कॉग्रेसच्या वतीने दिलेल्या निवेदनामुळे सदर प्रक्रीयेला २२ जुलै २०१७ पर्यंत मुदताढ मिळाली. ह्या मुदत वाढीमध्ये सुद्धा अतिशय अल्प प्रतीसाद मिळाल्याने पुढे ही मुदतवाढ २९ जुलै २०१७ पर्यंत मिळाली. दुसर्यांदा मुदतवाढ करुनही अपेक्षित नावनोंदणी न झाल्यामुळे विद्यापीठास तिसर्यांदा मुदतवाढीची नामुष्की ओढवली आहे. ह्या टप्यामध्ये ३ आँगस्ट २०१७ पर्यत मुदतवाढ मिळाली आहे.

लोकशाही मध्ये मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहन मिळणे गरजेचे असते परंतु घातलेल्या जाचक अटींमुळे, विशेष करुन पदवी प्रमाणपत्र (convocation certificate) हे खुप कमी लोंकाकडे आहे व ह्या प्रमाणपत्रास शेवटच्या वर्षाचे गुण प्रमाणपत्र(last year mark list) हा योग्य पर्याय उपलब्ध असतानाही विद्यापीठ ठरवुन ह्याकडे दुर्लक्ष करत आहे. विद्यापीठ अधिकार्यांकडे विनंती करुनही टोलवा टोलवीची उत्तरे दिली जातात.
आज पर्यंत मिळालेल्या अल्प प्रतिसादाची तरी विद्यापीठाने दखल घेऊन घातलेली पदवी प्रमाणपत्र (convocation certificate) ची अट शिथील करावी अन्यथा मुबंई विद्यापीठा प्रमाने सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्येही युवक कॉंग्रेसच्या वतीने आक्रमक आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या