स्वस्थ,व्यस्त,मस्त रहा पण सुस्त राहू नका : डॉ.शिकारपूर

शिक्रापुर,ता.९ अॉगस्ट २०१७(प्रा.एन.बी.मुल्ला) : जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, सकारात्मकता व जिद्द या त्रिसुत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे.त्यासाठी स्वस्थ, व्यस्त व मस्त रहा पण सुस्त राहू नका असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ.दिपक शिकारपूर यांनी केले.

शिक्रापूर येथे शिक्रापूर रोटरी क्लबच्या पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून शिकारपूर बोलत होते|कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुर्यकांत पलांडे होते.या कार्यक्रमात सन 2017 साठी शिक्रापूर रोटरीच्या अध्यक्षपदी डॉ.मच्छिंद्र गायकवाड तर सचिवपदी प्रा.संजय देशमुख यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत पदग्रहण केले.या कार्यक्रमास रोटरी क्लबचे प्रांतपाल अभय गाडगीळ, सहाय्यक प्रांतपाल डॉ.फिलोमन पवार, महामार्ग सुरक्षा पोलीस अधिक्षक अमोल तांबे, जि.प.सदस्या कुसुमतार्इ मांढरे, शिक्रापूर रोटरीचे संस्थापक अध्यक्ष विरधवल करंजे, माजी अध्यक्ष लध्दाराम पटेल, माजी सचिव प्राचार्य रामदास थिटे, उपाध्यक्ष रमेश भुजबळ, उद्योजक प्रकाश धोका, बापूसाहेब वाकचौरे, माजी सरपंच बापूसाहेब जकाते,  युवराज शिंदे, अश्लेषा घोलप, हडपसर रोटरीचे अध्यक्ष पोपट पालवे, माजी अध्यक्ष कुमार विधाते,,उद्योजक रवि भुजबळ, डॉ.राम पोटे, डॉ.वैजनाथ काशिद, संजीव मांढरे, रमेश वाळके, रोहीत खेरे, नवदिप देशमुख, डॉ.राजश्री गायकवाड, डॉ.सुरेखा ढमढेरे, संजीवनी पोटे, अॅड.रावसाहेब करपे, डॉ.धनंजय लोंढे, गोरक्ष दोरगे, अंजना बांदल आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना प्रांतपाल अभय गाडगीळ म्हणाले की सर्वसामान्य माणसाला असामान्य बनविण्याची किमया रोटरी करते.त्यामुळे रोटरीची पिन लावून अशक्यप्राय गोष्टी देखील शक्य करता येतात.

शिक्रापूर रोटरी क्लबने अल्पावधीतच सामाजीक कार्य तसेच उपक्रमातून गगनभरारी घेतली आहे असे गौरवोद्गार काढतानाच यापुढील काळात शिक्रापूर रोटरीच्या उपक्रमांना भरीव सहकार्य करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.शिक्रापूर रोटरी क्लबच्या वतीने र्इ लर्नींग संच, स्वच्छतागॄह, जलशुध्दीकरण संच, किशोरवयीन मुलींसाठी सॅनीटरी नॅपकीन व वेंडीग मशीन शाळामध्ये बसविण्यात येणार असून मोतिबिंदू शस्त्रक्रियेसह तिरळेपणावरील शस्त्रक्रिया , रक्तसंकलन व साठवन केंद्र, रोटरी डायग्नोस्टिक सेंटर उभारण्याचा मानस याप्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.मच्छिंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमात उद्योजक प्रकाश धोका यांच्या वतीने शिक्रापूर ग्रामीण रूग्णालयाला र्इ.सी.जी.मशीन देण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.संजीव मांढरे यांनी केले तर मयुर करंजे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या