देव्हडेश्वर याञेच्या आखाड्यात १२० मल्लांची हजेरी (Video)

शिरुर ग्रामीण, ता.९ अॉगस्ट २०१७(प्रतिनीधी) : शिरुर ग्रामीण(रामलिंग) येथील देव्हडेश्वर याञेनिमित्त भरविलेल्या जंगी निकाली कुस्त्यांच्या आखाड्याला जिल्हयातुन १२० मल्लांनी हजेरी लावली.
सालाबादप्रमाणे शिरुर ग्रामीण (रामलिंग) येथे देव्हडेश्वर याञेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.या वर्षी सात दिवस चालणा-या या उत्सवात अखंड हरिनाम सप्ताहाचे त्याच बरोबर कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत एकुण ९ संघांनी सहभाग नोंदविला. त्या पैकी शुभम गाडे फायटर्स व वडजाई (वडगाव सहाणी) येथील संघांनी अंतिम फेरीत धडक मारली.यात वडजाई संघ विजयी ठरला.

शेवटच्या दिवशी जंगी निकाली कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले. यात शिरुर, श्रीगोंदा, पारनेर, नगर,पुणे, आंबेगाव या तालुक्यातील आलेल्या मल्लांनी हजेरी लावली.या वेळी सुमारे १२० कुस्त्या निकाली झाल्या.कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणुन राष्ट्रीय पंच बाळासाहेब भालेराव, गेनुभाउ येलभर, खंडु थोरात, मधुकर घायतडक, यशवंत धरणे आदींनी काम पाहिले.

या प्रसंगी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे व परिसरातील मान्यवर आवर्जुन उपस्थित होते. देव्हडेश्वर मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई केल्याने मंदिरपरिसराला वेगळीच शोभा आलेली होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या