हुतात्म्यांच्या बलीदानाची जाणीव ठेवणे गरजेचे: ढमढेरे

तळेगाव ढमढेरे, ता.१० अॉगस्ट २०१७ (प्रा.एन.बी.मुल्ला) : भारतीय स्वातंत्र्य चळवळीत हुतात्म्यांनी दिलेले बलीदान व्यर्थ जाऊ न देण्यासाठी आपण सर्वांनी राश्ट्रहिताला प्राधान्य देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुणे येथील विद्या सहकारी बॅंकेचे विद्यमान संचालक महेषबापू ढमढेरे यांनी केले. 

क्रांतिदीनाचे औचित्य साधुन तळेगाव ढमढेरे येथील षिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील राश्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथे जनजागृती रॅली व अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती.  हुतात्मा विश्णू गणेश पिंगळे यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना यावेळी अभिवादन करण्यात आले.  यावेळी झालेल्या सभेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महेषबापू ढमढेरे बोलत होते.

शिरूर पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या अर्चनाताई भोसुरे, माजी सदस्या दिपालीताई शेळके, तळेगाव ढमढेरे गावच्या विद्यमान सरपंच ताई शेलार, उपसरपंच राकेश भुजबळ, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे मानद अध्यक्ष श्रीकांतदादा ढमढेरे,शिरूर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, यशस्वी उद्योजक संजयआबा ढमढेरे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक पोपट भुजबळ,प्राचार्य डॉ. दादा मरकळ, सुनिलबापू ढमढेरे, महेश भुजबळ, संजय भुजबळ, दत्तात्रय गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पद्माकर गोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. प्रदीप पाटील, दिपाली शेळके, श्रीकांत ढमढेरे, पोपट भुजबळ यांनीही मनोगत व्यक्त केले. 

या समारंभास महाविद्यालयातील डॉ. संदीप सांगळे, डॉ. मनोहर जमदाडे, प्रा. सोमनाथ पाटील, प्रा. अमेय काळे, प्रा. विवेक खाबडे, डॉ. रविंद्र भगत, प्रा. दत्तात्रय कारंडे, डॉ. प्रमोद पाटील, प्रा. निलेश पाचुंदकर, प्रा. अजिता भुमकर, प्रा. प्राजक्ता पवार, प्रा. उर्मिला घोलप, प्रा. दिलीप मुंजाळ, प्रा. कानिफनाथ शिंदे उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पद्माकर गोरे, सुत्रसंचालन प्रा. दत्तात्रय कारंडे यांनी तर आभार दत्तात्रय गायकवाड यांनी मानले. 

भुजबळ विद्यालयाच्या वतीने हुतात्मा पिंगळे यांना मानवंदना
तळेगाव ढमढेरे येथे क्रांती दिनानिमित्त विविध महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयातील विद्याथ्र्यांनी क्रांति दिनानिमीत्त प्रभातफेरी काढली.त्यानंतर हुतात्मा पिंगळे स्मारकात मान्यवरांच्या उपस्थितीत प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते  हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.याप्रसंगी राष्ट्रगीताचे गायन करून वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या.

येथील स्वातंञ्य सैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेतील विद्याथ्र्यांनी क्रांति दिना निमीत्त बँड पथकाच्या तालावर प्रभातफेरी काढली.त्यानंतर हुतात्मा पिंगळे स्मारकात शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, संचालक महेश ढमढेरे यांच्या हस्ते  हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून पुजण करण्यात आले.याप्रसंगी विद्यालयातील विद्याथ्र्यांच्या बँडपथकाने बँडच्या तालावर सैनिक गित वाजवून सर्व विद्याथ्र्यांनी व उपस्थित मान्यवरांनी मानवंदना दिली व अभिवादन केले.यावेळी विठ्ठलराव जेधे, उपप्राचार्य जगदीश राउतमारे, पर्यवेक्षक राजाराम पुराणे, सुवर्णा चव्हाण, रूपाली ढमढेरे, सुनिता पिंगळे, शिवाजी आढाव आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या