पिस्तुलाचा धाक दाखवुन लुटणा-या तिघांना अटक

शिक्रापुर,ता.११ अॉगस्ट २०१७(प्रतिनीधी) : फ्लिपकार्ड च्या मोबाईल विकणा-या डिलिव्हरी बॉय ला पिस्तुकाचा धाक दाखवुन लुटणा-या तिघांना चार दिवसांत शिक्रापुर पोलीसांनी शिताफीने अटक केली.यात एक पिस्तुल, ११ मोबाईल फोन,इतर वस्तु व कपडे हस्तगत करण्यात आले आहे.

शिक्रापुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,सणसवाडी गावच्या हद्दीत(ता.६ अॉगस्ट) रोजी दोघेजन त्यांच्याकडील मोटारसायकल वरुन फ्लिपकार्ड कंपनीचे अॉनलाइन-खरेदी/मागणी केलेले माल लिस्ट नुसार ग्राहकांना घरपोच विकण्यासाठी आले होते.त्यांनी मागणी केलेल्या लिस्ट मधील अमोल राउत या व्यक्तीस त्याच्या नावाने असलेले चार पार्सल विक्रीसाठी आले होते.सणसवाडी येथे आले असता अमोल राउत याच्या मोबाइलवर संपर्क साधला असता देवास कंपनीच्या गेटवर  येण्यास सांगितले.या वेळी फिर्यादी तेथे गेले असता अमोल राउत नावाचा इसम येथे राहत नसल्याचे समजल्याने पार्सल घेउन माघारी फिरले.

दरम्यान माघारी परतत असताना दोन अनोळखी इसमांनी,"तुम्ही कुरियरवाले का" व एकाने मी अमोल राउत आहे असे सांगुन गाडी थांबवायला सांगितली.त्यावेळी एकाने डिलिव्हरी बॉयला पिस्तुलाचा धाक दाखवुन जवळ असलेले पार्सलची बॅग व मोबाइल फोन असा एकुण सुमारे २ लाख ५हजार २३० रुपये किमतींचा माल चोरुन नेला.याबाबत राहुल आनंदा कोल्हे(वय.२४ रा.केसनंद) याने शिक्रापुर पोलीसांना फिर्याद दिली होती.

या घटनेचा वेगाने तपास करत पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरविली.शास्ञीय व तांञिकदृष्ट्या तपास करत संशयित म्हणुन दोन आरोपींना ताब्यात घेतले.त्यानंतर केलेल्या अंगझडतीमध्ये गुन्हयात चोरीस गेलेले ११ मोबाइल,इतर वस्तु व कपडे असा मिळुन १ लाख ९९ हजार १५४ रुपये किमतीचा माल हस्तगत केला.आरोपींनी गुन्हयात वापरलेले पिस्तुलही ताब्यात घेतले.या प्रकरणी साहिल हरिविलास कंजेरीया(वय.२०, रा.ढेरंगेचाळ, कोरेगाम भिमा), सागर विलास कापसे(वय.२३, रा.कोरेगाव भिमा), रत्नदिप साहेबराव माने(वय.२६, रा.सणसवाडी) यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती शिक्रापुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी दिली.

या घटनेच्या तपासात पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांच्यासह विलास आंबेकर, संदिप जगदाळे, योगेश नागरगोजे, ब्रम्हा पवार, तेजस रासकर, विजय गाले यांनी अवघ्या चारच दिवसांत सखोल चौकशी करत आरोपी ताब्यात घेण्यात महत्तवाची कामगिरी केली.  

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या