वयाच्या2 2व्या वर्षी 'तो' झाला क्लास वन अधिकारी (Video)

शिरुर, ता.१२ अॉगस्ट २०१७ (संदिप घावटे) :  येथील अक्षय पंडित वेताळ हा तरुण असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर जिद्द व मेहनतीने भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे.
अक्षय चे आईवडील दोघेही प्राथमिक शिक्षक. मूळ गाव देव दैठण (ता. श्रीगोंदे) त्याचे प्राथमिक शिक्षण मलठण व अण्णापूर (ता. शिरूर) तर माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशाला शिरुर येथे झाले. बारावी विज्ञान शाखेत 91% गुण मिळवून जेइइ परीक्षेच्या माध्यमातून आयआयटी खरगपूर येथे आर्किटेक्चर शाखेत निवड झाली होती पण अंतराळ संशोधन कडे अक्षय चा कल होता.हे शिक्षण घेत असताना प्रत्येक सेमिस्टरला 75% गुण मिळवून 46000 रुपये स्कॉलरशिप मिळवली. ही स्कॉलरशिप आठ वेळा मिळवली. त्यातूनच कॉलेजची फी अक्षयने भरली. मन लावून अभ्यास केल्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड दिला नाही.

तिरुअनंतपूर (केरळ) येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ़ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये 156 विद्यार्थ्यांच्या बॅच मध्ये प्रवेश मिळाला. देशातील हे एकमेव कॉलेज आहे.ए पी जे अब्दुल कलाम हे या कॉलेजचे कुलगुरू होते तेथे चार वर्षात बी टेक एव्हीओनिक्स पदवी ८१ टक्के गुण प्राप्त करून मिळवली. या बॅच मधून १०२ विद्यार्थी इस्त्रो साठी निवडले गेले त्यात महाराष्ट्रातील अक्षय सह तिघेजण आहेत.पुढील महिन्यात स्पेस ऑप्लिकेशन सेंटर अहमदाबाद(गुजरात) येथे शास्त्रज्ञ क्लास वन अधिकारी म्हणून हजर होणार आहे.

या वेळी, "भारतीय अवकाश संशोधन संस्थेत राहून भारतमाते ची सेवा अखंड पणे करत रहाणार व देशसेवा हेच माझे करिअर आहे. ए पी जे अब्दुल कलाम यांचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवणार आहे. शालेय जीवनात विस्तार अधिकारी मुकुंद  देंडगे  यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. विद्याधाम प्रशालेत योग्य दिशा मिळाली. आई वडील व सर्व गुरू यांना हे यश समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया अक्षयने www.shirurtaluka.com शी बोलताना व्यक्त केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या