शिरुर ला छत कोसळुन एक जखमी

शिरूर,ता.१२ अॉगस्ट २०१७(अभिजित आंबेकर) : शिरूर शहरातील हुडको वसाहत (संभाजीनगर) येथे एका घराचे छत कोसळून एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

या बाबत मिळालेली माहिती पुढील प्रमाणे, शिरूर शहरातील हुडको वसाहतीमधील चरण चौधरी यांचे घर असून (दिनांक १०) रोजी दुपारी चरण चौधरी यांचा मुलगा महेश चौधरी हा घरी डेंगू ने आजारी असून तो घरी झोपला असता अचानक पणे घराच्या वरील छत महेश याच्या अंगवर कोसळले त्यामुळे महेशच्या चेहऱ्याला व छातीला मुक्का मार लागला.या घटनेनंतर एकच खळबळ उडाली सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले या घटनेनंतर घटना स्थळी नगरसेवक संदीप गायकवाड,समता परिषदेचे किरण बनकर,नगरसेवक मंगेश खांडरे,संजय देशमुख,पाणी पुरवठा समितेचे सभापती मुझफ्फर कुरेशी, आरोग्य समितीचे सभापती सचिन धाडीवाल,नगरसेविका उज्वला वारे ,संतोष शितोळे,प्रवासी संघाचे अनिल बांडे,मनविसेचे अविनाश घोगरे,शिरूर तालुका संघटक कैलास भोसले,शहर संघटक राजेंद्र शिंदे,युवा सेना शहर अधिकारी सुनील जाधव,तुकाराम खोले,भाजपाचे तुषार वेताळ,शैलेश जाधव,कलीम सय्यद,संजय बांडे आदी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली.दरम्यान ११ रोजी सकाळी नगरपालिकेचे बाधकाम विभागाचे अभियंता संजय कुंभार,शहर अभियंता शंकर कांबळे  यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली व जखमी महेश चौधरी यांच्याशी चर्चा करून आवश्यक उपाययोजनान विषयी सूचना दिल्या.

दरम्यान या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या ३६५ घरांची हि हुडको घरकुल योजना १९८९ साली निर्माण झाली त्या नंतर या घरावरील हप्ते भरण्यासाठी २००५ पर्यंत सर्वांनी या घरावरील हप्ते भरल्या नंतर २००६ पर्यत हि घरे नावावर होणे अपेक्षित होते  मात्र १२  वर्ष होऊनसुद्धा आजही हि घरे मूळ घर मालकांच्या नावावर नसून त्यामुळे घरची अत्यंत दुरवस्था झाली असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेवून राहवे लागत आहे.या बाबत अनेक वेळा आश्वासने देवून सुद्धा अद्यापपर्यंत घरे नावावर न झाल्याने नागरिक हतबल झाले आहे स्वताची घरे असून सुद्धा त्या ठिकाणी काही हि करता येत नसल्याने नागरीकांनपुढे हि घरे कधी नावावर होणार या सारखा प्रश्न उभा राहिला आहे.मात्र या गंभीर प्रश्नांबाबत अनेक निवडणुकीत आश्वासने दिली गेली.मात्र कुणीही या विषयावर आश्वासने पूर्ण करताना दिसत नसल्याबाबत नागरीकांमधुन बोलले जात आहे.

याबाबत बांधकाम विभागाचे अभियंता संजय कुंभार म्हणाले कि,३६५ घरांची हि हुडको घरकुल योजना १९८९ साली झालेली असुन हुडकोवासीय नागरीकांची घरे त्यांच्या नावावर लावुन देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी ता.१०/१०/२०१६ रोजी प्रस्ताव कार्यासन अधिकारी (ज -५),महसुल व वन विभाग मंत्रालय मुंबई येथे प्रलंबीत आहे.त्याबाबत नगरपरीषदेकडून पाठपुरावा सुरू आहे.येथील घरांच्या दुरावस्थेबाबत नगरपरीषदेच्या सभेमध्ये निर्णय घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या