...अन साजरी झाली विशेष मुलांची दहिहंडी

शिरुर, ता.१९ अॉगस्ट २०१७(सतीश केदारी) : दुपारची वेळ...अचानक ४०-५० महिला जमा होतात...आणि गाणी-गप्पा या बरोबरच चिमुकल्यांचा दहिहंडी चा  कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजराही केला जातो.हे चिञ होते शिरुर येथील आकांक्षा एज्युकेशनल फौंडेशनमधले.

शिरुर येथील रामलिंग रोड लगत आकांक्षा एज्युकेशनल फौंडेशन ही विशेष मुलांची संस्था गेल्या काही वर्षांपासुन मतिमंद, डाउन सिंड्रोम,सेरेब्रल पाल्सी अशा विशेष मुलांसाठी काम करत आहे.या संस्थेत सुमारे २० मुलांचा सांभाळ केला जात आहे.

शिरुर येथे अॅक्टिव्ह सोशल या महिलांच्या ग्रुप च्या माध्यमातुन विधायक कामे केली जातात.गुरुवारी(दि.१७) रोजी दुपारी अचानक हजेरी लावत या महिलांच्या ग्रुप ने आकांक्षा फौंडेशन च्या विशेष मुलांसोबत दहिहंडी साजरी केली.त्याचबरोबर विशेष मुलांसोबत फराळाचा आनंदही लुटला.या ग्रुपच्या महिलांनी सोबत आणलेली विविध प्रकारची खेळणी व वस्तु भेट म्हणुन देण्यात आल्या.

या वेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकांक्षा फौंडेशन च्या संस्थापिका राणीताई चोरे यांनी केले. विशेष मुलांच्या दहिहंडी कार्यक्रमासाठी पवन कट्यारमल,सागर चामंदे, रोमील बोरा, सुरेश भंडारी, संस्थेचे विश्वस्त मनसुख गुगळे या मान्यवरांनी हजेरी लावली.या वेळी बोलताना कामिनी बाफना म्हणाल्या कि, समाजात नेहमी अनेकजण विधायक उपक्रम राबवत असतात.परंतु ज्यांना ख-या अर्थाने मदतीची गरज आहे अशाच संस्थांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहण्याची गरज असुन इतर घटकांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

या वेळी आकांक्षा एज्युकेशनचा झालेला खडतर प्रवास ऐकताना उपस्थित सर्वच भावुन होउन गेले.या दहिहंडी साठी अॅक्टिव्ह ग्रुप च्या शितल फुलफगर, सोनम चंडालिया, भारती लोढा, पुजा पोखरणा व इतर महिलांनी विशेष परिश्रम घेतले.या वेळी संस्थेतील कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. तर या वेळी विशेष मुलांमध्ये दहिहंडी सण साजरा करतानाचा वेगळाच आनंद प्रथमच पहायला मिळत होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या