टाकळी हाजी परिसरात पोलीसांकडुन दारुअड्डे उद्ध्वस्त

टाकळी हाजी, ता.२० अॉगस्ट २०१७(प्रतिनीधी) : शिरुर पोलीसांनी टाकळी हाजी परिसरात अवैध धंद्यावाल्यांच्या मुसक्या आवळणे सुरु केले असुन अनेक ठिकाणचे दारुअड्डे उद्ध्वस्त केले आहेत.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्याच्या पश्चिम पट्टयात बहुतांश भागात दारुअड्डे जोरात सुरु असल्याबाबत  माहिती मिळाली होती.त्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासुन सतत होणा-या कारवायांमुळे अवैध धंद्यावाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.टाकळी हाजी नजीक असलेल्या रोहिलेवाडी गावात नदीच्या कडेला दुर्गम भागात राञीच्या वेळेस अचानक छापा टाकत सुमारे १० बॅरल बनविलेली गावठी दारु सह १६००लिटर रसायन नष्ट केले.या प्रकरणी टाकलेल्या छाप्यात ४२००० रुपयांचा माल मिळाला होता.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक एस.एस.वाघमोडे यांच्यासह पोलीस कर्मचारी उमेश भगत, करणसिंग जारवाल आदींनी सहभाग घेतला.

शिरुर तालुक्याच्या पश्चिम पट्टयात पोलीसांनी अवैध धंद्यावाल्यांच्या मुसक्या आवळणे सुरु केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असुन शिरुर हद्दीतील इतर भागातही पोलीसांनी दारुधंदे व अवैध धंद्यावाल्यांवर कारवाइ करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या