शिक्रापुरात भरचौकातील एटीएमच चोरट्यांनी पळविले

शिक्रापूर, ता.२५ अॉगस्ट २०१७ (शेरखान शेख) : येथील पाबळ चौकातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मशीन ची चोरट्यांनी पंधरा लाख रुपयांसह चोरी केली असून संपूर्ण एटीएम मशीन चोरट्यांनी गायब केली असल्याचा प्रकार मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडला असून सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या एटीएम मशीनचा चोरीचा प्रयत्न मागील महिन्यात फसला होता परंतु आता मंगळवारी रात्री चोरट्यांनी शिक्रापूर येथील पाबळ चौक या भरगर्दीत असना-या चौकामध्ये पुणे नगर रस्त्यापासून अगदी काही अंतरावर असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये चोरी केली असून या बँकेचे एटीएम मशीनच पूर्णपणे उचलून नेले असून त्यामध्ये असलेले पंधरा लाख रुपयांसह संपूर्ण एटीएम मशीन उचलून नेले आहे.

बुधवारी सकाळी अकरा वाजता एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी बँकेने काम दिलेल्या कंपनीचे अधिकारी आले असता त्यांना शिक्रापूर येथील एटीएम सेंटर मध्ये मशीनच दिसले नाही तसेच तेथील सीसीटीव्ही केमेरे सुद्धा तुटलेले दिसून आले. त्यांनतर त्यांनी कंपनीला माहिती दिल्यानंतर कंपनीने सिस्टीममध्ये तपासणी केली असता ते मशीन रात्री चार वाजता बंद पडलेले दिसून आले.या मशीन मध्ये पंधरा लाख बासस्ट हजार रुपये शिल्लक होते. त्यामुळे चोरट्यांनी संपूर्ण एटीएम मशीनच उचलून नेले असल्याने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.

तसेच बँकेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत ईपिएस कंपनीचे एटीएम मेनेजर इराप्पा चंदप्प मेलेकरी (रा. ससाणेनगर, हडपसर. मूळ रा.केडउमरगा ता. आळंद जी. कुलबर्गी कर्नाटक) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून शिक्रापूर पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.

रात्री उशिरा देखील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरु असल्याने चोरट्यांबाबत जास्त काहीही माहिती मिळू शकली नाही तर शिक्रापूर येथे झालेल्या चोरीतील आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी रवाना केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले हे करत आहे.

बँका सुरक्षिततेबाबत उदासीन का ?
पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बँका तसेच एटीएमची चोरी झाली असून कित्येकदा मोठा मुद्देमाल चोरी गेला आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कोरेगाव भिमा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एटीएमच्या चोरीचा डाव फसला होता. तेव्हा येथे सुरक्षितता नसल्याचे आढळून आले होते. त्यानंतर लगेचच आता शिक्रापूर येथील एटीएम मशीनच चोरट्यांनी पंधरा लाख रुपयांसह चोरून नेले असल्याने बँका सुरक्षिततेबाबत उदासीन का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या