कर्डेत चोरट्यांची वृद्धास मारहाण करत जबरी चोरी

कर्डे,ता.२६ अॉगस्ट २०१७(प्रतिनीधी) : कर्डे(ता.शिरुर) येथे अज्ञात चोरट्यांनी वृद्ध दांपत्यास मारहाण करुन दोन तोळे सोने व तीन हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली.या घटनेत वृद्ध दांपत्य जबर जखमी झाले आहेत.


शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर रोडे हे कर्डे येथील घरी झोपले असता  त्यांच्या घरापासुन काहि अंतरावर आजी भागुबाई कुंडिलक रोडे व आजोबा कुंडलिक वामन रोडे हे फिर्यादीच्या घरापासुन वेगळे राहत असुन शुक्रवार(दि.२५) रोजी पहाटे तीनच्या सुमारास फिर्यादी यांना जोरजोरात त्यांची आजी आजोबा यांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येउ लागला.तसेच फिर्यादी यांच्या मोबाईलवर फोन येउ लागल्याने फिर्यादी,त्यांचा भाउ तुषार व वडील असे उठुन आजोबांच्या घराकडे गेले असता त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असलेला दिसला.

घरात आत गेल्यानंतर फिर्यादीचे आजोबा कुंडलिक रोडे यांच्या उजव्या पायाच्या मांडीला व तोंडाला चांगलाच मार लागला होता.त्यामुळे ते हलुच शकत नव्हते.तसेच फिर्यादीची आजीला कमरेला व डाव्या बाजुच्या तोंडाला मारहाण झाल्याचे दिसल्यानंतर व फिर्यादी यांच्या आजोबांची बहिन कासुबाई सालके यापण घरात होत्या.त्यांनाही चोरटयांनी डोक्यात कशाने तरी मारहाण केली होती व रक्त येत होते.या वेळी फिर्यादीच्या आजी-आजोबांनी चार चोरट्यांनी घरात घुसुन मारहान करुन घरातील चाळिस हजार रुपये किंमतीची बोरमाळ, दोन ग्रॅम वजनाची पाच हजार किंमतीची कानातील बुगडीची जोड,दोन ग्रॅम वजनाची पाच हजार रुपये किंमतीची कानातील फुले ,दोन ग्रॅम वजनाची पाच हजार रुपये किंमतीची डब्यात ठेवलेली  कर्णफुले, व रोख रक्कम तीन असा मिळुन सुमारे ५८ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला आहे.

दरम्यान या मारहाणीत कुंडलिक वामन रोडे यांना जबर दुखापत झाली असुन त्यांना शिक्रापुर येथील खासगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी सागर विजय रोडे(वय.२३,रा.कर्डे) यांनी फिर्याद दिली आहे.

गेल्या महिन्यात जबरीचोरीची ही तिसरी घटना असुन या प्रकारांनी स्थानिक नागरिक भयभीत झाले असुन कायदा सुव्यवस्थेबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.या घटनेचा तपास  शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक भिमगोंडा पाटील हे तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या