तळेगाव ढमढेरेत पुन्हा बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला

तळेगाव ढमढेरे,ता.२६ अॉगस्ट २०१७ (जालिंदर आदक) :  तळेगाव ढमढेरे येथील मोहनमळा येथे अजय सुरेश जेधे यांच्या गोठ्यातील दोन शेळ्या, एक बोकड या प्राण्यांना अंदाजे एक हजार फुटापर्यंत बिबट्याने ओढत शेजारील काशिनाथ ढमढेरे यांच्या शेतात खाऊन टाकले. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण झाले आहे.

सोमनाथ ढमढेरे व संभाजी ढमढेरे यांनी उसामध्ये असलेल्या अर्धवट अवस्थेत खालेला बोकड उसातून बाहेर काढला.जनाबापू काळे व ए.एस. होले यांनी घटनेची स्थळ पाहणी करून पंचनामा केला.मागील काही दिवसांपुर्वी या परिसरात अनेक घटना घडल्या असल्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावला होता परंतु  बिबट्या सापडला नसुन येथील शेतकरी भयभीत झाले आहे.  

अनेक दिवसापासून तळेगाव ढमढेरे, खंडोबाची वस्ती, केवटेमळा, जगतापवस्ती, मुळेवस्ती, गुरवमळा, कमेवाडी, बिबट्या आला असल्याची माहिती वनविभागाला वेळोवेळी कळवली असूनही, या भागात कोणाची वासरे बिबट्याने खाल्ली आहे तर कोणाची शेळ्या फस्त केल्या तर काहींची घरापुढील पाळीव प्राणी लंपास केलेल्या घटना मागील काळात घडल्या आहेत परंतु वनविभागाला यश आले नाही.यावेळेस तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत सदस्य गोविंद ढमढेरे यांनी तातडीने शेतकऱ्यास मदत मिळावी व नागरिकांनी सतर्क राहावे तसेच वन विभागाने सापळे लावावे अशी विनंती वन विभागाला केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या