अबब..! डि.जे चालकाला भरावा लागला ८० हजारांचा दंड

शिरुर,ता.३१ अॉगस्ट २०१७(विशेष प्रतिनीधी) : शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील डीजे सिस्टिम चालकाला सुमारे ८० हजारांचा दंड भरावा लागला असल्याची माहिती शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र  कुंटे यांनी दिली.

याबाबत दिलेली माहिती अशी कि, शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत गतवर्षी मॉडिफेशन करुन वापरात असलेल्या डि.जे वाहनावर शिरुर पोलीसांनी कारवाई करुन ताब्यात घेतले होते.हे ताब्यात घेतलेले वाहन क्र. एम.एच.०६ जी ३४३१ हे गेल्या वर्षभरापासुन शिरुर पोलीस स्टेशनच्या आवारात जप्तीनंतर लावलेले होते.या वाहनाला सोडविण्यासाठी वाडेगव्हाण(ता.पारनेर) येथील मालकाने बुधवारी(ता.३०) रोजी सुमारे ८० हजार रुपये दंड भरला व त्यानंतर हे वाहन ताब्यात देण्यात आले.

या संदर्भात शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी बोलताना सांगितले कि, हा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.मिरवणुकित पारंपारिक वाद्याचा वापर करावा.ध्वनिप्रदुषण व इतरांना ञास होणार नाही याची काळजी घ्यावी.जर कोणी फालतुपणा अथवा विक्षिप्त वागत असेल तर अशांवर कडक करावाई केली जाईल.

शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील डीजे वर दंडात्मक कारवाई केल्याने माञ इतरांचे धाबे दणाणले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या