अन् शिरुर नगरपालिका प्रशासन खडबडुन झाले जागे

शिरुर,ता.१ सप्टेंबर २०१७ (सतीश केदारी) : शिरुर शहरात डेंग्युच्या प्रादुर्भावाने महिलेचा मृत्यु झाल्यानंतर आज शुक्रवार(दि.१)रोजी तालुका आरोग्य विभाग व शिरुर नगरपरिषद खडबडुन जागे होत शहरातील महादेवनगर परिसरापासुन जनजागृती करुन नागरिकांना डेंग्युच्या आजाराचा प्रादुर्भाव थांवण्याबाबत सुचना करण्यात आल्या.या वेळी नगरपालिकेचे सर्वच नगरसेवक रस्त्यावर उतरले होते.

सविस्तर असे कि, काल गुरुवारी(दि.३१) रोजी हुडको वसाहतीत राहणा-या निवृत्त शिक्षिकेचा डेंग्युच्या आजाराने मृत्यु झाला होता.त्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी उशिरा नगरपालिकेच्या सभागृहात याबाबत तातडीची सभा घेण्यात आली.यामध्ये तालुका  आरोग्य विभाग व नगरपालिका  प्रशासनाच्या संयुक्त पथकाने उपाययोजना करण्याचे ठरले.त्यानुसार लोकांची जनजागृती करत नगरपरिषद व आरोग्य विभागाच्यावतीने नागरी वसाहतींची स्वच्छता करण्यात आली.

शिरुर शहरामध्ये वाढत असलेला डेंग्यु आजाराचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी नगरपालिका व आरोग्य विभागाच्या वतीने संयुक्त पथक तयार करण्यात आले असुन धडक मोहिम राबविली जात आहे.हे पथक दोन दिवसांत संपुर्ण शहराचे सर्वेक्षण करणार असुन दुपारी तीन नंतर शहरातील एक-एक भागात विशेष स्वच्छता मोहिम राबविणार असल्याचे मुख्याधिकारी विदयादेवी पोळ यांनी बोलताना सांगितले.पुढे माहिती देताना पोळ यांनी सांगितले कि,ज्या ठिकाणी नवीन बांधकामे चालु आहेत,त्या बांधकाम करणा-या नागरिकांना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने नोटिसा देण्यात येत असुन त्याची अंमलबजावणी न करणा-या नागरिकांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे तात्काळ दाखल करण्यात येतील.तसेच आजपासुन धुरळणी यंञाच्या साहाय्याने घराघरात जाउन धुरळणी करण्यात येणार असुन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.

या वेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शिंदे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, स्वच्छता व आरोग्य विभागाचे सभापती सचिन धाडिवाल, पाणी पुरवठा सभापती मुजफ्फर कुरेशी, माजी नगरसेवक दादाभाउ वाखारे, नगरसेवक अभिजित पाचर्णे, विठ्ठल पवार, विनोद भालेराव, नगरसेविका, मनिषा कालेवार, उज्जवला बरमेचा,संगिता मल्लाव, ज्योती लोखंडे,मनसेचे महबुब सय्यद, संदिप कडेकर, अविनाश घोगरे, डॉ. संभाजी कोहोकडे, स्वच्छता निरीक्षक दत्ताञय बर्गे, महेमुद बेग, यांसह परिसरातील नागरिक, स्वच्छता व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या