बीट मार्शल पथकाने वाचविला युवकाचा प्राण

शिरुर,ता.३ सप्टेंबर २०१७(प्रतिनीधी) : पुणे ग्रामीण पोलीस दलात बीट मार्शल पथक प्रभावी कार्यरत केल्याने शिरुर शहरात या पथकाच्या तत्परतेमुळे एकाचा जीव वाचविण्यात यश आले आहे.

शिरुर पोलीसांनी दिलेल्यानुसार,शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत बीट मार्शल व दामिनी पथकाला नुकतेच पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी प्रथमोपचार पेटीसह आश्यक साधने उपल्ब्ध करुन दिली आहे.हे पथक शनिवारी शहरात गस्त घालत असताना पोलीसांना हॉटेल मधुबनजवळ अपघात झाल्याची माहिती मिळाली.त्यानुसार काही क्षणात त्या ठिकाणी या पथकातील एस.वाय साळवे, ए.एन पवार हे  कर्मचारी पोहोचले.या वेळी कवठे येमाई येथील शंकर मुसदुडे या अपघातग्रस्त तरुणास तत्काळ उपचारांसाठी पाठविण्यात आले.यावेळी उपस्थित नागरिकांनी या पथकाच्या तत्परतेचे कौतुक करत आभार मानले.

पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी वॉकी टॉकी,टॉर्च, रेनकोट, व्हिजिटिंग कार्ड सह प्रथमोपचार पेटीही या पथकाच्या वाहनात सर्व साहित्यासह दिल्याने पोलीस दलातील कर्मचा-यांकडुन समाधान व्यक्त केले जात आहे.या वाहनाला सायरन असल्याने गर्दीतुन वाट काढणे सोपे जाणार असुन जीपीएस व वॉकीटॉकी ही दिली गेली असल्याने हे पथक कसे काम करत आहे याची माहिती थेट पोलीस नियंञण कक्षाला मिळत आहे.

नागरिकांनी संपर्क साधल्यास काही क्षणात हे पथक घटनास्थळी पोहोचल्याने अनेक अनर्थ टळणार असुन अशाच प्रकारे काम केले गेल्यास आपत्कालीन प्रसंगात जनतेला मोठा दिलासा मिळणार हे नक्की.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या