घोडगंगेच्या स्विकृत संचालकपदी नरेंद्र मानेंची निवड

शिरसगाव काटा, ता.३ सप्टेंबर २०१७(प्रतिनीधी) : येथील सोसायटीचे माजी चेअरमन नरेंद्र माने यांची रावसाहेबदादा पवार घोडगंगा कारखान्याच्या स्विकृत संचालकपदी एकमताने निवड करण्यात आली.

घोडगंगा कारखाना कार्यस्थळावर संचालकांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकित नरेंद्र माने यांच्या नावावर एकमताने सर्वांनी सहमती दर्शविल्याने स्विकृत संचालक म्हणुन निवड करण्यात आली.यानंतर शिरसगाव काटा ग्रामस्थांच्या वतीने नवीन उपाध्यक्ष सुभाष कळसकर व माने यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या वेळी कळसकर यांनी शेतक-यांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.तर माने यांनी सर्वांना सोबत घेउन काम करणार असल्याचे उपस्थितांना सांगितले.या प्रसंगी बाजारसमितीचे संचालक विजेंद्र गद्रे, सरपंच सतीश चव्हाण,उपसरपंच प्रकाश चव्हाण, माजी सरपंच संजय शिंदे, माणिक कदम आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या