बाबुरावनगर ला कच-यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शिरुर,ता.ता.४ सप्टेंबर २०१७(प्रतिनीधी) : बाबुरावनगर ला कच-याचे साम्राज्य पसरले असुन नागरिकांना साथीच्या आजारांची लागण झाल्यावरच संबंधित प्रशासन जागे होणार का? असा सवाल  येथील रहिवासी अलका ढाकणे यांनी केला आहे.

शिरुर शहरात डेंग्यु सह साथीच्या आजाराने थैमान घातले असुन अनेक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.या वेळी काही नागरिकांनी संकेतस्थळाशी संपर्क साधुन या कच-याची माहिती दिली.या वेळी पाहणी केली असता रस्त्याच्या कडेलाच कित्येक दिवसांचा कचरा पडला असुन दुर्गंधी येत आहे.या वेळी येथील रहिवाशांनी बोलताना सांगितले कि घंटागाडी वेळेवर येत नसल्याने अनेकांनी कचरा रस्त्यावर टाकला.त्यामुळे हा कचरा सातत्याने साचत आहे.डेंग्यु ची साथ संपुर्ण शहरात असुन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.

यानंतर नगरपालिकेकडुन स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली माञ बाबुरावनगर ला असलेल्या संबंधित ग्रामपंचायत चे माञ या कच-याकडे दुर्लक्ष होत  असुन  या मुळे या नागरिकांचे जीव धोक्यात आले असल्याची प्रतिक्रिया अलका ढाकणे यांनी व्यक्त  केली आहे. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या