...'तो' प्रसंग अंगाचा थरकाप उडवणाराच होता (Video)

न्हावरे, ता.१० सप्टेंबर २०१७ (सतीश केदारी) : सगळे कुटुंबिय  झोपेत असताना गरम पाण्याच्या टाकीचा झालेला स्फोट अन् त्यानंतरचं चिञ हे अंगाचा थरकाप उडविणारं होतं. काळाने माता-पित्याचं छञ हिरावलं... माञ, चिमकुल्यांवर दया केली असल्याचे न्हावरे येथील शेंडगे कुटुंबियांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना सांगितले.

 
न्हावरे (ता.शिरुर) येथील तांबेवस्ती येथे राहणारे बाळू शेंडगे व चांगुणा शेंडगे या पती-पत्नीचा हिटरच्या तापलेल्या पाण्याचा स्फोट होऊन उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. या घटनेबाबत या कुटुंबियांची भेट घेतली असता त्या कुटुंबियांनी घडलेली आपबिती कथन केली.

शेंडगे कुटुंब हे अत्यंत कष्टाळु. नेहमी कामाची लगबग सुरु असायची. परंतु त्या दिवशी नियतीला माञ ते मंजुर नव्हते. बाहेरगावी जायचं आहे म्हणुन इतर कामे आटोपुन तयारी केल्यानंतर राञी हिटर लावलेला होता. मध्यराञीच्या सुमारास या हिटरमधले पाणी उकळल्यानंतर टाकीसह मोठा स्फोट झाला. उकळते पाणी या पती-पत्नीच्या अंगावर झोपेतच पडल्याने दोघांनाही प्रचंड भाजले. यानंतर दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एकापाठोपाठ या दोघांचाही मृत्यू झाला.

सुदैवाने चिमुकले बचावले...

या पती-पत्नीच्या मागे दोन मुले आहेत. घटना घडण्याच्या दिवशी उशिर झाल्याने आजोंबाकडे दोनही चिमुरडे झोपी गेले होते. त्यामुळे या चिमुकल्यांवर देवाने दया केली असल्याचे बाळू शेंडगे यांच्या वडिलांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना सांगितले.

मदतीला उभे राहिले अनेकांचे हात...

काही तासांच्या फरकावर पती-पत्नीचा मृत्यु झाल्यानंतर दोन मुलांचं छञ हरपलं आहे. त्याचप्रमाणे बाळु शेंडगे यांच्या मागे वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. घटनेची माहिती कळताच शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, खरेदी विक्री चे संचालक आबासाहेब सोणवणे, माजी आमदार अशोक पवार, बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे, न्हावरे ग्रामपंचायत आदींनी भेट देउन मदतीचा हात पुढे केला आहे. तर ग्रामस्थांच्या वतीने या कुटुंबाला आधार देण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या