शिरुर तालुका.कॉमवरून मिळणार शेतीमालाचे बाजारभाव

शिरूर, ता. 12 सप्टेंबर 2017 : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती व तळेगाव ढमढेरे येथील बाजार समितीचे बाजारभाव www.shirurtaluka.com वरून देण्यास सुरू करण्यात आले असून, शेतकरी वर्गाने या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीउपबाजार तळेगाव ढमढेरे येथील बाजार समितीमध्ये कोणकोणत्या मालांची आवक झाली व त्यांचे बाजारभाव नेमके किती आहेत, याबद्दलची माहिती www.shirurtaluka.com वरून देण्यात येत आहे. यामुळे शेतकऱयांना घरबसल्या बाजारभावाची माहिती मिळू लागली आहे. यापुर्वी शेतकऱयांना बाजार समितीमधून आलेल्या शेतकऱयाकडे याबाबत चौकशी करावी लागत होती. परंतु, सोशल नेटवर्किंगमुळे एका क्लिकवर बाजराभावाची माहिती मिळू लागली आहे.

शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी सोशल नेटवर्किंगचे महत्त्व जाणून याबद्दलची माहिती www.shirurtaluka.comला उपलब्ध करून दिली आहे.

दरम्यान, www.shirurtaluka.com वरून पेट्रोल, डिझेलचे दररोजचे दर नेटिझन्सना उपलब्ध करून दिले जातात. इंधन व बाजार समितीचे बाजारभाव वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध होऊ लागले असून, यापुढेही वाचकांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या