माझ्याकडे दोन पिस्तूल आहेत, संपूर्ण खानदान संपवीन...

शिक्रापूर, ता. 13 सप्टेंबर 2017: माझ्याकडे दोन पिस्तूल आहेत, माझ्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली तर संपूर्ण खानदान संपवीन, अशी धमकी एका अवैध सावकाराने ज्येष्ठ शिक्षकाला दिली. संबंधित शिक्षक प्रचंड तणावाखाली वावरत आहे.

शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अवैध सावकार व्याजाचा धंदा करत आहे. त्या अवैध सावकाराने एका युवकाला व्याजाने रक्कम दिली आहे. मुद्दलीपेक्षा व्याजाचा आकडा हा काही लाखांमध्ये गेला आहे. काही महिन्याचे व्याज न मिळाल्यामुळे अवैध सावकार हा त्या युवकाच्या घरी गेला होता. कुटंबातील नागरिकांना त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्या युवकाचे वडील हे शिक्षक आहेत. दारू प्यायलेल्या अवैध सावकाराने शिक्षकाला चारचाकीमध्ये बसवून अज्ञात स्थळी नेले. अगोदरच मोटारीमध्ये असलेल्या तिघांनी शिक्षकाला वेठीस धरून धमकी देणे सुरू ठेवले. शिक्षकाकडील मोबाईल काढून घेतला. माझ्या विरोधात जर पोलिसांकडे तक्रार दिली तर... काही महिने कारागृहात राहील. परंतु, बाहेर आल्यानंतर संपूर्ण कुटुंबच संपवून टाकीन. माझ्याकडे दोन पिस्तूल आहेत, हे लक्षात ठेवा, अशी धमकी दिली.

शिक्षकाला धमकी दिल्यानंतर सोडून देण्यात आले. परंतु, या धमकीनंतर संपूर्ण कुटुंब तणावाखाली वावरताना दिसत आहे. आम्ही त्याचे संपूर्ण पैसे देणार आहोत. परंतु, त्या अवैध सावकाराकडून आमच्या कुटुंबाला धोका आहे, असे शिक्षकाने सांगितले.

दरम्यान, www.shirurtaluka.comने 'शिरूर तालुक्यात अवैध सावकारकीमुळे कुटंब उद्धस्त...' या मथळ्याखाली वृत्त प्रसारीत केले असून, मुख्यमंत्र्यांनाही ट्विट केले आहे. शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारकीचा व्यवसाय सुरू आहे. या अवैध सावकारांना वेळीच पायबंध घालणे गरजेचे आहे. पोलिसांनी तक्रार दाखल न होण्याची वाट पहाता कारवाई करणे गरजेचे आहे, असे नेटिझन्स म्हणतात. संबंधित पोलिस अधिकाऱयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मोबाईल उचलला गेला नाही. अवैध सावकाराची मालिका सुरू ठेवली जाणार असून, मुख्यमंत्र्यांपर्यंत ते पोचवले जाणार आहे.
(क्रमशः)

संबंधित वृत्तः

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या