शिरूर तालुक्यात पावसाने काही सुखावले; काही दुखावले

शिरूर, ता. 15 सप्टेंबर 2017: शिरूर तालुक्यातील विविध भागांमध्ये झालेल्या पावसामुळे काही शेतकरी सुखावले तर काही दुखावले आहेत. पावसामुळे पेरणीसाठी बळीराजा सुखावला आहे. मात्र, काही भागात वळवाच्या पावसामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने त्या शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शिरूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून दमट वातावरण आहे. अचानक आलेल्या वळवाच्या पावसामुळे शेतकऱयांची धांदल उडाली होती. विजेच्या कडकडाटात सुरू झालेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणीच पाणी करून टाकले आहे. या पावसामुळे विहीरी, नाले, ओढे भरून वाहताना दिसत आहे. दमदार पाऊस पडल्यामुळे बळीराजा पेरण्याच्या तयारीला लागला आहे. परंतु, काही ठिकाणी शेतकऱयांनी काढलेली पिके शेतातच ठेवली होती. वळवाच्या या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून, यामधूनच रस्ता काढून वाहनचालकांना जावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला व शेतांमध्ये पाणीच पाणी दिसू लागले आहे. यामुळे शिरूर तालुक्यात पावसामुळे काही सुखावले तर काही जण दुखावल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

आजाराचे प्रमाण वाढले...

हवामान बदलामुळे नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. थंडी-तापामुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत. शिरूर तालुक्यातील रुग्णालयांमध्ये गर्दी दिसू लागली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या