फियाट कंपनीकडून 'आकांक्षाच्या' विद्यार्थ्यांची तपासणी

शिरुर, ता.१६ सप्टेंबर २०१७ (प्रतिनीधी) : फियाट कंपनीच्यावतीने शिरुर शहरातील विविध शाळांसह आकांक्षा एज्युकेशनल फौंडेशनच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी  करण्यात आली.

शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील फियाट कंपनीच्या सामाजिक जबाबदारीच्या भावनेतुन सीएसआर टिमने नुकतीच रामलिंग रोड लगत असलेल्या आकांक्षा एज्युकेशनल फौंडेशन या विशेष मुलांच्या शाळेतील सुमारे १७ विद्यार्थ्यांची तपासणी केली. या वेळी ज्या विद्यार्थ्यांना कृञिम अवयवांची व साधणांची आवश्यकता आहे. त्यासाठी मोजमाप घेण्यात आले असून, या कंपनीकडून अशा विद्यार्थ्यांची नोंद घेतली आहे. लवकरच त्यांना ती साधणे उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या वेळी आलेल्या अधिका-यांनी विशेष मुलांच्या तपासणीनंतर खाऊ वाटप केले.

या वेळी फियाट कंपनीचे सीएसआर मॅनेजर संदिप निमसे, विशेष तज्ञ संजय मंडल, विपिन रावत, विशेष शिक्षक राहुल आवारी, पंचायत समितीचे तालुका समन्वयक संदिप क्षिरसागर आदी उपस्थित होते. संस्थेच्या संस्थापिका राणीताई चोरे यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांची माहिती देऊन आलेल्या टिमचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या