शिरूर तालुक्यात बैलपोळा उत्साहात साजरा (Video)

शिरूर, ता. 20 सप्टेंबर 2017: शिरूर तालुक्यात मंगळवारी (ता. 19) बैलपोळा मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. पोळ्यानिमित्त बैलांची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. बैलांचे प्रमाण कमी असले, तरी सर्वच ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती. दरवर्षीच्या तुलनेत शेती मशागतीच्या कामांमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या मात्र घटत चालली आहे.मंगळवारी सकाळ पासूनच पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची लगबग चालू होती. सकाळी दहा वाजल्यापासूनच आपले बैल धुण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु होती. बैलांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांना सजविण्यात आले होते. बैलांच्या शिंगांना हिंगुळ, बेगड, शेंब्या, फुगे यांच्या सहाय्याने व विविध रंगांच्या सहाय्याने रंगविण्यात आले होते. विविध गावांमध्ये बैलपोळ्यानिमित्त बैलांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. या वेळी बैलांना विविध रंगांनी रंगविण्यात आले होते. परिसरात बैलांचे प्रमाण कमी असले, तरी सर्वच ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती.


(व्हिडिओः तेजस फडके)

बैलपोळ्या निमित्त घरोघरी पुरणपोळ्या करण्यात आल्या होत्या. सायंकाळी सजविलेल्या बैलांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. फटाक्याच्या आतषबाजीत, गुलालाची उधळण करीत, बँड पथक व पारंपारिक वाद्यांच्या तालात मोठ्या उत्साहात शेतकरी आपापल्या बैलजोडी सह मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूकीमध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित झाल्याचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळत होते. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असले तरी बैलांची संख्या मात्र कमी जाणवत होती. विविध गावांत शेतकऱ्यांनी बैलपोळा उत्साहात साजरा करत होते.

सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेले फेसबुक व व्हॉट्सऍपवरून सजविलेल्या बैलांची व मिरवणूकीचे व्हिडिओ शेअर करत होते. या छायाचित्रांना व व्हिडिओंना मोठे लाईक्स व प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे.

आवाहनः

तुमच्या भागातील बैलपोळ्याची छायाचित्रे अथवा व्हिडिओ shirurtaluka@gmail.com वर जरूर पाठवा. संबंधित छायाचित्रे, व्हिडिओ आम्ही प्रसिद्ध करू.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या