नवरात्रीनिमीत्त उरळगाव येथे आरोग्य शिबीराचे आयोजन

उरळगाव,ता.२६ सप्टेंबर २०१७(रमेश बांडे) : नवरात्र उत्सवाच्या निमीत्त बुधवार (दि.27) रोजी उरळगाव येथे अखिल उरळगाव नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने सर्वरोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे येथिल सहयाद्री हॉस्पिटलच्या सहकार्याने या शिबीराचे आयोजन केले जाणार असून सहयाद्री हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टरांचे पथक रूग्णांची तपासणी करणार आहेत.या शिबीरामध्ये ह्रदयरोग, नेत्ररोग, सांधेदुखी, मधूमेह, कर्करोग याबरोबरच सर्व प्रकारच्या आजारांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.त्याचबरोबर मोफत रक्तदाब तपासणी रक्तातील साखर तपासणी, डोळयांची तपासणी व गरजेनुसार र्इसीजी इ.ची मोफत सुविधा शिबीरामधून उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती मंडळाचे संयोजक रमेश बांडे, दिपक काळे व संतोष जाधव यांनी दिली.

उरळगाव येथिल अखिल उरळगाव नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने 9 वर्षापासून नवरात्र उत्सव विविध विधायक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जात आहे. उत्सव काळात दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवून समाजोपयोगी कार्य करण्याचा मंडळातील कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो.उत्सव काळामध्ये मंडळाच्या वतीने दुर्गामाता मुर्तीची मिरवणुक काढून प्राणप्रष्ठिापना  केली जाते. दररोज सकाळी व  सायंकाळी आरती केली जाते. रात्री दांडिया व देवीच्या गाण्यांचा जागर आयोजित करण्यात येतो. याच दरम्यान तीन दिवस उरळगाव फेस्टिवल आयोजित केला जातो व त्यामधून गावातील मुला मुलींचे कलागुणांना वाव मिळावा या हेतुने त्यांच्या सांस्कॄतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा घेतल्या जातात.

या स्पर्धांमध्ये सहभागी होणा-या मुला मुलींना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके दिली जातात.शिवाय वढु बु.येथिल माहेर संस्थेच्या मुलांचे कार्यक्रम ठेवून त्यांना मंडळामार्फत आर्थिक मदत दिली जाते.समाजप्रबोधनासाठी किर्तन प्रवचन व व्याख्यानांचे आयोजन केले जाते. ग्रामस्थ या काळात उत्स्फुर्तपणे सहभागी होउन नवरात्रीचा आनंद लुटतात. विशेष म्हणजे गावातील महिला खूप मोठया प्रमाणात उत्सवादरम्यान सहभागी होतात.

हा नवरात्र उत्सव यशस्वी व्हावा याकरिता मंडळाचे  दिपक काळे, संतोष जाधव, भाउसो कोकडे, संतोष घायतडक,सागर गिरमकर,भिमा कुदळे, समशेर शेख विनोद काटे, संदिप बांडे, रवींद्र जाधव, सुधिर पवार, भाउसो गायकवाड, गोरक गुंजाळ, राजु पाचुंदकर, अंकुश नवले इ. संयोजक दिवस रात्र मेहनत घेतात. तसेच गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच सोसायटी पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ यांचे बहुमोल सहाकार्य लाभत असल्याने हा उत्सव यशस्वी वाटचाल करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या