शिरुरला लवकरच जनावरांचा बाजार- शशिकांत दसगुडे

शिरुर, ता.२८ सप्टेंबर २०१७ (सतीश केदारी) : शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या प्रयत्नांना यश आले असुन लवकरच जनावरांचा बाजार सुरु करणार असल्याचे बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी सांगितले.

शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दसगुडे यांनीही माहिती दिली.शिरुर ला पुर्वी जनावरांचा बाजार सुरु होता.परंतु कालांतराने तो बंद पडला.या मुळे या परिसरातील शेतक-यांचे मोठ्या प्रमानावर हाल होत होते.अनेकांना मोठ्या प्रमाणावर  भुर्दंड बसत होता.शेतक-यांच्या मागणीचा विचार करता दसगुडे यांच्यासह संचालक मंडळाने बाजार चालु करण्यासाठी वेळोवेळी चाचपणी केली.अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाले असल्याच्या भावना दसगुडे यांनी व्यक्त केल्या.

प्रारंभी सचिव दिलीप मैड यांनी सभेचा वृत्तांत वाचुन दाखविला.या वेळी विकास जगताप यांनी बाजार समितीच्या माध्यमातुन शेतक-यांसाठी प्लॅस्टिक क्रेट व दुधासाठी कॅन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.सादलगाव येथील तुषार शितोळे यांनी पॅकेजिंग हाउस उभारण्यात यावे अशी मागणी केली.तर चिंतामणी येळे यांनी कांदामार्केट लवकरात लवकर सुरु करण्यात यावे अशी सुचना मांडली.उपस्थित शेतक-यांनी वडगाव रासाई ला सबयार्ड सुरु करावे अशीही सुचना मांडली.या वेळी शिरुर ला होणा-या कृषी प्रदर्शनाच्या जागेची पाहणी करण्यात आली.

या प्रसंगी बाजार समिती संचालक विजेंद्र गद्रे, संतोष मोरे, सतीश कोळपे, सुदिप गुंदेचा, बंडु जाधव, प्रविण चोरडिया, अॅड.वसंत कोरेकर, शंकर जांभळकर,विकास शिवले, छायाताई बेनके, मंदाकिनी पवार, कोषागार अनिल ढोकले, अधिकारी, कर्मचारी आदींसह  शेतकरी व विविध संस्थांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या