महामार्गावर किती जीव गेल्यावर जाग येणार? (Video)

शिरूर, ता. 29 सप्टेंबर 2017 (सतीश केदारी): पुणे-अहमदनगर महामार्गावर असलेल्या न्हावरा फाटा येथे आणखी किती जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

 
पुणे-अहमदनगर महामार्गावरील न्हावरा फाटा येथे 17 जून 2017 रोजी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील मामा-भाचीला जीव गमवावा लागला होता. यापुर्वीही येथे अनेकदा अपघात होऊन अनेकांना प्राणाला मुकावे लागले आहे. महामार्गावरील विविध भागांमध्ये रस्ते ओलांडताना अडचणी येत आहेत.

महामार्गावरील परिस्थीतीमध्ये गेल्या तीन महिन्यांत कोणतीही सुधारणा झालेली नाही. परिस्थिती जैसे थे आहे. रात्री-अपरात्री अथवा दिवसा न्हावरा चौक ओलांडने म्हणजे जीव मुठीत घेतल्यासारखे आहे. www.shirurtaluka.comने नुकतीच या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाचा Video केला आहे. यामधून या भागात प्रवास करणे किती आवघड आहे, हे दिसून येते.

प्रशासन आणखी किती जीव जाण्याची वाट पहात आहे? आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. शिरूर तालुक्यातील स्वतःला नेते समजणारे अथवा प्रसिद्धीच्या पुढे-पुढे करणारे आता कुठे गेले आहेत? असा रोख-ठोक सवाल एका नागरिकाने केला आहे. शिरुर अहमदनगर महामार्गावर काहि दिवसांपुर्वी न्हावरे फाटा येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक देउन  अपघात होउन मामा-माचीचा जागीच मृत्यु झाला होता.यानंतर सामाजिक कार्यकर्ते योगेश ओव्हाळ व सतीश केदारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी नम्रता रेड्डी यांची भेट घेउन अपघातप्रवण क्षेञात योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली होती.परंतु घटनेला दिड महिने उलटुनही या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी असणा-या झेब्रा क्रॉसिंग चे पट्टे दिसेनासे झाले आहेत.त्याचप्रमाणे न्हावरे रोड कडे जाणा-या रस्त्यावर असणारे गतिरोधक हे झिजुन  गेले असल्याने या ठिकाणी न्हावरेच्या बाजुने येणा-या वाहनांचा वेग जास्त असल्याने व गतिरोधक हेही जाणवत नसल्याने वाहने थेट महामार्गावरच जाउन थांबतात.वाहनचालकांना वेगाला आवर न घालता आल्याने अपघाताचा मोठा धोका संभवतो.त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

त्याचप्रमाणे शिरुर बाह्यवळण महामार्गानजीक असणा-या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी साचले असुन भुयारी मार्गाला तळ्याचे स्वरुप आले आहे.याच बाह्यवळण मार्गावर (बायपास)लगत राञीच्या वेळी रस्ता ओलांडताना निमोणे येथील युवकाला जीव गमवावा लागला आहे.त्याचप्रमाणे या ठिकाणी गेल्या दोन महिन्यात अनेक गंभीर स्वरुपाचे अपघात घडले आहेत.सध्या भुयारी मार्गात पुर्णपणे पावसाचे पाणी साचल्याने भुयारी मार्ग बंद असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालुन नाइलाजाने रस्ता ओलांडावा लागत असुन या ठिकाणी बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का  असा सवाल वाहनचालक व नागरिकांकडुन व्यक्त केला जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या