शिरुर नगरपालिकेची स्वच्छतेसाठी धडक मोहिम

शिरुर,ता.२९ सप्टेंबर २०१७(अभिजित आंबेकर) : स्वच्छता हीच सेवा या उपक्रमाअंतर्गत शिरुर नगरपरिषदेच्यावतीने दि.१५ सप्टेंबर ते २ अॉक्टोबर या कालावधीत शिरुर शहरात स्वछता  मोहिम राबविली जात असुन शहरातील विविध शासकिय कार्यालयात ही मोहिम राबविण्यात आल्याची माहिती शिरुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विदयादेवी पोळ यांनी दिली.

शिरुर नगरपालिकेने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत विविध शासकिय कार्यालयांनी स्वच्छता कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.या मध्ये रविवारी(दि.२४)रोजी शिरुर पोलीस स्टेशन ला सर्व पोलीस बांधवांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेत स्वच्छता केली.त्याचबरोबर शासकिय मतिमंद मुलींची शाळा, सर्टिफाइड स्कुल, नगरपालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प,जलशुद्धिकरन केंद्र, आदी ठिकाणी स्वच्छता निरीक्षक दत्ताञय बर्गे, यांसह नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, अधिकारी वर्ग व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.सोमवारी(ता.२५) रोजी शिरुर बसस्थानक, रामआळी, अंडेबाजार, शहरातील सर्व उद्याने, छ.शिवाजी महाराज पुतळा, हुतात्मा स्मारक,इंदिरा गांधी पुतळा, सार्वजनिक शौचालये, या ठिकाणी सकाळच्या सञात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.तर दुपारच्या सञात शहरातील सर्व हॉस्पिटल व परिसरात स्वच्छता मोहिम  पालिकेचे सभागृह  नेते प्रकाश धारिवाल व  नगराध्यक्षा वैशाली  वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली  राबविण्यात आली.

मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर शहरात (दि.१ सप्टेंबर) पासुन शिरुर नगरपरिषदेने गुड मॉर्निंग पथकासह गुड इविनिंग पथकाची स्थापना केली असुन या पथकातील एकुण २० कर्मचारी यांच्याकडुन दररोज पहाटे पाच ते आठ व सायंकाळी साडेसहा ते साडे आठ वाजेपर्यंत प्रत्यक्ष अशा  ठिकाणांची पाहणी केली जात आहे.या मुळे या भरारी पथकाने राबविलेल्या धडक मोहिमेमुळे उघड्यावर शौचास जाणारे आढळुन आले नसल्याची तसेच शहरातील नागरिकांनीही नगरपालिकेच्या स्वच्छता  मोहिमेला स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला असुन स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये प्रबोधन करणार असल्याची माहिती दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या