'व्यसनांबाबत समाजात जनजागृती व्हायला हवी' (Video)

रांजणगाव गणपती, ता.३ अॉक्टोबर २०१७ (सतीश केदारी) : तंबाखु हे व्यसन घातक असुन समाजात व्यसनांबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुक्तांगणच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी केले.बजाज कंपनीत आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.


 
दारु इतकीच तंबाखु ही घातक असुन तंबाखुच्या व्यसनाबाबत समाजात आजही अज्ञान असल्याचे पहायला मिळत असुन या बाबत गैरसमज मोठ्या प्रमाणात आढळुन येत आहेत.तंबाखु च्या सेवणाने थेट कर्करोगाला निमंञण मिळत असुन शरिरासाठी अपायकारक व सर्वात घातक व्यसन आहे.तर दारुबंदीच्या विषयावर बोलताना,सरकारने ५०० मीटर च्या अंतरावर घेतलेला दारुबंदीचा निर्णय हा योग्यच होता.रस्ते अपघातात दारुच्या सेवणामुळे होणा-या अपघातांचे प्रमाण हे लक्षणीय असुन दारुबंदीच्या काळात अपघात कमी झाल्याचे नोंद आहे.तरुण व्यसनाधिनतेकडे वळत चालला असुन व्यसनांबाबत  समाजात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

संजय भगत यांनी बजाज कंपनीने व्यसनाधिनतेबाबत घेतलेला पुढाकार स्तुत्य असल्याचे म्हणत कंपनीच्या अधिका-यांचे विशेष कौतुक केले.प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादुर शास्ञी यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालुन जयंती साजरी करण्यात आली.तसेच उपस्थित मान्यवरांना वृक्ष देउन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सुञसंचालन केतकी चौगुले यांनी केले तर बापु बारहाते यांनी आभार मानले.यावेळी बजाज कंपनीतील प्लॅंट हेड अनिल गुप्ता, मनुष्यबळ विभागाचे प्रमुख दिपक कुलकर्णी, सी एसआर समन्वयक बापू बारहाते तसेच  सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या