...अन् सभापतींनी भाजल्या चुलीवर भाकरी (Video)

शिरुर, ता.५ सप्टेंबर २०१७ (सतीश केदारी) : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार यांनी चुलीवर भाकरी भाजल्या तर इतर महिलांनी चुलीवर भाकरी करण्यासाठी पवार यांना मदत केली. या चुलीवर भाजलेल्या भाकरी आंदोलन कर्त्यांनी निवेदनासमवेत  तहसिलदारांना दिल्या. राष्ट्रवादीने प्रथमच तहसिलकार्यालयावर भाकरी थापून अभिनव आंदोलन केल्याने या आंदोलनाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती.

 
शिरुर येथे शिरुर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने शेतक-यांना संपुर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे व शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी शिरुर तहसिल कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार हे बोलत होते.

पवार म्हणाले, 'केंद्र शासनाच्या व राज्यशासनाच्या अनेक निर्णयाचा फटका गोरगरीब शेतक-यांना बसला आहे. नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दुरगामी परिणामी झाला. देशात ज्या प्रमाने उलथा पालथ झाली, याचप्रमाने राज्यात अन तालुक्यातही राज्यशासनाच्या धरसोड वृत्तीचा फटका बसला. शिरुर तालुक्यात विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवर टिका करत चासकमान च्या पाण्याचं योग्य नियोजन न केल्याने तालुक्यातील जनतेचे पिके जळून कोट्यावधींचे नुकसान झाले.'

या वेळी माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांनी घणाघाती टिका करत सरकारच्या घोषणा या निव्वळ फसव्या असून हे जोडा..ते जोडा असे करत सर्वच जोडायला लावणा-या केंद्र सरकारला जनता हि जोडे लगावल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.


 
बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी शरद पवार हे कृषीमंञी असताना शेतमालाच्या बाजारभावात समानता आणलेली होती. परंतु, या सरकारने शेतकरी उद्धवस्त करण्याचे काम चालवले असल्याचे म्हटले.

या वेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, जि. प. सदस्य राजेंद्र जगदाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे, शहराध्यक्ष पल्लवी शहा आदींची भाषणे झाली. या प्रसंगी पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, बाजार समिती उपसभापती विश्वास ढमढेरे, खरेदीविक्री संघाचे राजेंद्र नरवडे, शिरुर प॑चायत समिती उपसभापती मोनिका हरगुडे, कारखान्याचे संचालक सुधीर फराटे, नरेंद्र माने, शहराध्यक्ष जाकीरखान पठाण, नगरसेवक मुज्जफर कुरेशी, उत्तम सोणवणे, अॅड. वसंत कोरेकर, सतीश कोळपे, गणेश रोडे, पंडित दरेकर, संगिता शेवाळे, सिमा फराटे, पोलीस उपनिरीक्षक भिमगोंडा पाटील, उपनिरीक्षक युसुफ  इनामदार, संतोष कदम, यासह तालुक्यातील संस्थाचे पदाधिकारी व  महिला कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन शिरुर चे तहसिलदार रणजित भोसले यांनी स्विकारले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या