शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीचे कार्य कौतुकास्पद: पवार

शिरुर, ता.१२ अॉक्टोबर २०१७ (सतीश केदारी) : शिरुर कृषी उत्पन्न ची वाटचाल हि प्रगतीच्या दिशेने सुरु आहे. जनवरांचा बाजार सुरु करुन बाजारसमितीने शेतक-यांसाठी उचलले धाडसी पाउल हे निश्चितच स्वागतार्ह असल्याचे प्रतिपादन शिरुर-हवेली चे माजी आमदार अॅड. अशोक पवार यांनी केले.

शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या नवीन मार्केट यार्ड येथे आज गुरुवार (दि.१२) रोजी अॅड अशोक पवार यांच्या हस्ते फित कापुन  शुभारंभ करण्यात आला.या वेळी अॅड. पवार हे बोलत होते.


पुढे बोलताना पवार म्हणाले कि, शिरुर तालुक्यातील जनतेने बाजारसमितीत बहुमताने सत्ता दिल्यानंतर शशिकांत दसगुडे यांनी सभापतीपदाची सुञे हाती घेत तोट्यातील असलेली संस्था अल्पावधीत नफ्यात आणण्याचे काम केले.बाजारसमितीत महिन्याला होणारे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले.कामगारांचे थकविलेले पगार दिलाच परंतु व्यापा-यांची देणी गोळा करुन बाजारसमितीचा कायापालट केला.या साठी संचालक मंडळाने मोलाचे सहकार्य केले.सतरा वर्षांपुर्वी बंद पडलेला जनावरांचा बाजार सुरु करणे हा सभापती दसगुडे व संचालक मंडळाचा धाडसी निर्णय असुन या निमित्ताने शिरुर,श्रीगोंदा, पारनेर, तसेच खेड, आंबेवगावच्या भागातील बहुतांश शेतक-यांच्या सोयीचा बाजार ठरणार असुन या निमित्ताने त्यांची परवड थांबणार असल्याचे पवार यांनी सांगितले.माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांनी बोलताना सांगितले कि, शिरुर तालुक्यात सहकाराची मुहुर्तमेढ रोवण्यात तालुक्यातील जुन्यापिढीतील रायकुमार गुजर, रावसाहेबदादा पवार यांच्यासह तत्कालीन ज्येष्ठांचे मोलाचे योगदान आहे.एकेकाळी दुष्काळी ओळख असलेल्या शिरुर तालुक्याचे रुपडे पालटण्याचे काम शरद पवार यांच्यासह इतर नेतेमंडळींनी केले. त्यामुळे शिरुर तालुका सुजलाम सुफलाम झाल्याचे दिसते.त्यामुळे राष्ट्रीय नेत्यांना विसरता येणे शक्य नसुन सभापती दसगुडे व संचालक मंडळाने तालुक्यातील शेतकरी बांधवांचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत संचालक मंडळाचे कौतुक केले.तर माजी आमदार पोपटराव गावडे यांनी हा जनावरांचा भरवलेला बाजार हा हळुहळु वाढत जाणार असुन या निमित्ताने रचनात्मक कामांचा उत्तम नमुना सर्वांसमोर उभा असल्याचे सांगितले. शेतक-यांनी शिरुर बाजारसमितीला सहकार्य करण्याचे आवाहन गावडे यांनी केले.

प्रारंभी दसगुडे यांनी प्रस्ताविकात संस्थेच्या अडचणी व त्यातुन काढलेला मार्ग, सर्वांनी दिलेली साथ याचा उल्लेख करुन या बाजारात येणा-या पशुपालक व व्यापा-यांना सोयी सुविधा पुरविण्याबरोबरच पारदर्शकता व सुरक्षितता देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगत आलेल्या शेतक-यांचे व व्यापा-यांचे स्वागत केले.आभार बाजारसमितीचे उपसभापती विश्वासकाका ढमढेरे यांनी मानले.

सुञसंचालन संदिप  सरोदे यांनी केले.या वेळी श्रीफळ वाढवुन व फित कापुन बाजाराचा शुभारंभ करण्यात आला.या बाजारात प्रथमच शेकडो जनावरे दिसुन येत होती तर मोठी उलाढाल होणार असल्याचे सचिव दिलीप  मैड यांनी सांगितले.
या वेळी बाजारात प्रथमच आलेल्या व्यापारी,पशुपालक शेतक-यांचा फेटा बांधुन बाजारसमितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला रावसाहेबदादा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रा.सुभाष कळसकर, जि.प.सदस्य राजेंद्र जगदाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवि काळे, घोडगंगाचे संचालक नरेंद्र माने, खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, शेतकरी संघटनेचे बाळासो घाडगे, दामुशेठ घोडे, बाजारसमितीचे संचालक विजेंद्र गद्रे, शंकरदादा जांभळकर, मंदाकिनी पवार, बंडु जाधव, प्रविण चोरडिया, सुदिप गुंदेचा, संतोष मोरे, अॅड.वसंत कोरेकर, विकास शिवले,रंजण झांबरे, कोशपाल अनिल ढोकले आदी मान्यवर शेतकरी, व्यापारी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या