शिरूर तालुक्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस

शिरूर, ता. 13 ऑक्टोबर 2017 (तेजस फडके): शिरूर तालुक्यात शुक्रवारी (ता. 12) दुपारच्या सुमारास सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र दिसत होते. ओढे-नाले तुडुंब भरून वाहत होते.


 
शिरूर तालुक्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास सुमारे दीड तास जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ झाली. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने परिसरातील सर्व रस्त्यांवर व शेतात पाणी साठले तर काही ठिकाणचे रस्ते चिखलमय झाले होते.

ठिकठिकाणी ओढे-नाले भरून वाहताना दिसत होते. रस्त्यांवरूनही पाणी वाहत होते. अनेक वर्षानंतर असा पाऊस अनुभवायला मिळाला. बच्चे कंपनी पावसाचा आनंद लुटतानाचे चित्र पहायला मिळत होते. पावसामुळे विविध ठिकाणी कांदा लागवड थांबली असून, शेतात वाफसा कधी होईल या प्रतिक्षेत सध्या शेतकरी आहेत. दमदार व मुसळधार पाऊस झाल्यामुळे काही शेतकऱयांचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या