शिरुर तालुक्यात आणखी एक खासगी साखर कारखाना

शिरुर,ता.३१ अॉक्टोबर २०१७(सतीश केदारी) : शिरुर तालुक्यात सहकारी साखर कारखान्यांची अवस्था बिकट असताना आणखीन एक नवा साखर कारखाना सुरु होत असल्याने सहकार अडचणीत आणन्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा शिरुर तालुक्यातील नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.

शिरुर तालुक्यात घोडगंगा हा एकमेव सहकारी साखर कारखाना असुन त्यानंतर साखर सम्राटांनी व्यंकटेश या खासगी  कारखान्याची उभारणी केली.शिरुर तालुक्यात नेहमीच सहकार अडचणीत असल्याचे सहकार क्षेञात बोलले जात असताना नेहमी व्यंकटेश वरुन वादावादी होत असल्याचे तालुक्यातील जनतेने पाहिले.घोडगंगा कारखाना अडचणीत असल्याचे अनेकांनी मान्य केले आहे.त्याचप्रमाने व्यंकटेश हा खासगी कारखाना उभारल्यानंतर वादाला चांगलेच तोंड फुटले ते आजतागायत सुरु आहे.शिरुर तालुक्याच्या बेट भागात पराग अॅग्रो फुड्स अॅंड अलाईड प्रॉडक्टस प्रा.लि  नव्याने उभारलेल्या खासगी कारखान्याची गळित हंगामाचीही सुरुवात होत असल्याचे खाञीलायक वृत्त असुन या मुळे शिरुर तालुक्यात  एक सहकारी व दोन खासगी कारखाने असे मिळुन तीन साखर कारखाने होणार आहेत.

शिरुर तालुक्यातील उभारलेल्या या नव्या खासगी कारखान्याने जाहिरातबाजी केली असली तरी खरा मालक कोण हे माञ अद्याप गुलदस्त्यातच असुन याबाबत शिरुर-हवेली, शिरुर आंबेगाव या तालुक्यात नागरिकांमध्ये चर्चांना उधान आले आहे.

या नव्या खासगी कारखान्याने सहकारावर परिणाम होणार असल्याचे जाणकारांमध्ये बोलले जात असुन याचा फायदा तालुक्याला कितपत होणार असा सवाल तालुक्यातील नागरिकांकडुन व्यक्त केला जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या