महसुलला हाकेच्या अंतरावरील वाळुउपसा का दिसत नाही ?

शिरुर,ता.१४ नोव्हेंबर २०१७(सतीश केदारी) : शिरुर तालुक्यात महसुलकडुन अन्यञ जोरात कारवाई सुरु असल्याचे भासवले जाते परंतु तहसिल कार्यालयापासुन काही अंतरावरील वाळु उपसा महसुल अधिका-यांना का दिसत नाही असा सवाल शिरुर नगरपालिकेचे पाणी पुरवठा सभापती मुझफ्फर कुरेशी यांनी केला आहे.

शिरुर नगरपरिषद हद्दीतील शनिमंदिर व परिसरात होत असलेल्या बेकायदेशीर वाळु उपश्यासंदर्भात महसुल विभागाला वारंवार तोंडी सुचना देउन सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही.येत्या आठ दिवसांत वाळु उपश्यास प्रशासनाकडुन कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिरुर नगरपालिकेचे पाणी पुरवठा सभापती मुझफ्फर कुरेशी यांनी  निवेदनाद्वारे दिला आहे.या संदर्भात एक निवेदन महसुल नायब तहसिलदार एस.यु.शेख यांना दिले आहे.या वेळी किसान क्रांती संघटनेचे राज्य समन्वयक नितीन थोरात आदी उपस्थित होते.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, शिरुर नगरपरिषद हद्दीतील शनिमंदिर, दशक्रिया विधी घाट परिसर या ठिकाणी घोडनदी पाञातुन पोकलेनद्वारे यांञिकी पद्धतीने गेल्या दोन महिन्यांपासुन अवैध रित्या वाळु उपसा सुरु असुन त्यामुळे घोडनदी पाञाला मोठमोठे खड्डे पडले आहेत.या बेकायदेशीर वाळु उपशामुळे घोडनदी पाञात मोठ मोठे खड्डे पडले आहेत.हे खड्डे धोकादायक असुन ग्रामीण भागात वाळु उपशानंतर प्रथमच नगरपरिषद हद्दीत वाळु उपसा सुरु झाल्याने भविष्यात उन्हाळ्यात शिरुरकरांना दुष्काळास सामोरे जावे लागणार आहे.

घोडनदी पाञात गोलेगाव पासुन ते दशक्रिया घाटापर्यंत वाळु सम्राटांनी अक्षरश: थैमान घातले आहे.हा वाळु उपसा राञीच्या वेळी सुरु असुन जसं काही महसुल प्रशासन हे वाळु सम्राटांनी विकतच घेतले आहे.सर्वसामान्यांवर कायद्याचा बडगा दाखविणारे अधिकारी येथील वाळु सम्राटांच्या पुढे कायद्याची अंमलबजावणी करायला का कमी पडतात? शिरुर तालुक्यात महसुल प्रशासन ५०-६० कि.मी वर कारवाई केल्याचे चिञ भासवते परंतु शहरात तहसिल कार्यालयापासुन काही अंतरावरील वाळु उपशावर का कारवाई करत नाही असा सवाल मुझफ्फर कुरेशी यांनी केला आहे.या निवेदनामुळे पुन्हा एकदा अवैध वाळु उपशाचा विषय ऐरणीवर आला असुन महसुल प्रशासन जो पर्यंत कारवाई करत नाही तो पर्यंत शासनाचा महसुल असाच बुडत राहणार.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या