..तर खड्ड्यांसाठीही स्वतंञ बजेट काढायला लागेल

शिरुर,ता.२९ नोव्हेंबर २०१७ (प्रतिनीधी) : राज्यातील रस्त्यांवर इतके खड्डे झाले आहेत कि एकञित मोजुन सरकारला हिशोब दिल्यास सरकारलाही रस्त्यांच्या खड्ड्यांसाठी स्वतंञ बजेट काढायला असा टोला जि.प.सदस्य रोहित पवार यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचे नाव न घेता लगावला.

चंद्रकांत दादा पाटील यांनी खड्डे दाखवा-एक हजार रुपये मिळवा असे आवाहन केले होते.त्यांच्या या वक्तव्याचा रोहित पवार यांनी हल्लाबोल आंदोलनात खरपुस समाचार घेत राज्य व केंद्र सरकारवर कडाडुन टिका केली.शिरुर तालुका राष्ट्रवादी च्या वतीने शिरुर बाजार समिती येथील शिवाजी पुतळा ते तहसिलदार कार्यालय असा भव्य मोर्चा काढुन हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.या वेळी पवार हे बोलत होते.

राज्य व केंद्र सरकार वर घणाघाती टिका करताना ते म्हणाले कि,सरकारने अनेक निर्णय आणले.परंतु ते निर्णय सर्वसामान्यांच्या मुळाशी आल्याने अनेक जण अडचणीत आले.जीएसटी चा घाई-घाई निर्णय घेतला परंतु निवडणुका आल्या कि पुन्हा त्यात बदल करण्यात आला.शेतक-यांसाठी कर्जमाफी ची घोषणा करण्यात आली परंतु त्यातही भेदभाव केला गेला. निवडणुका आल्या कि यांचं अशा पद्धतीचे राजकारण सुरु होतं.राज्य कुपोषित असुन बुलेट ट्रेन ची घोषणा करता ते जर पैसे भुकबळी साठी दिले तर अनेकांचा जीव नक्कीच वाचतील असे सांगत अरे हे  कसलं राजकारण सुरु असुन असं राजकारण या पुर्वी महाराष्ट्रात कधीच दिसलं नाही. खड्डेमुक्ती, शिक्षण,नोटबंदी, शेतमाल बाजारभावआदी विषयांवर पवार यांनी तोफ डागत दोन वर्षात अनेक जण रस्त्यावर येणार असुन राज्य व केंद्र सरकारच्या कामकाजावर पवार यांनी कडक शब्दांत घणाघाती टिका केली.

माजी आमदार अशोक पवार यांनी बोलताना, तालुक्यात चासकमान पाण्याचं विद्यमान आमदारांना नियोजन करता येत नसल्याची टिका करत डिसेंबर मध्येच पाणी सोडण्याचा अट्टहास कशासाठी असा सवाल व्यक्त केला.सत्तेत असताना शिरुर तालुक्यात अनेक वीज उपकेंद्रे उभी करता आली परंतु विद्यमान आमदारांना एकही उपकेंद्र सोडाच परंतु जळालेले ट्रान्सफॉर्मर वेळेत बसवता येत नाहीत असे म्हणत शेतकरी हा मोडित निघाला असुन नियोजनाचा अभाव व सरकारच्या फसव्या घोषणांमुळेच आंदोलन करण्याची वेळ येत आहे असे सांगत अशोक पवार यांनी चौफेर टिका केली.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवि काळे यांनी राष्ट्रवादीला तीन महिन्यात सात वेळा आंदोलने करावी लागली असुन शेतकरी अन सर्वसामान्यांसाठी या पुढीलही काळात सरकारला जागे आणण्यासाठी वेळोवेळी आंदोलने करणारच असे ठणकावुन सांगितले.

या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, बाजारसमिती चे सभापती शशिकांत दसगुडे,खरेदी विक्रीचे चेअरमन राजेंद्र नरवडे, उपसभापती विश्वास ढमढेरे,खरेदी विक्रीचे व्हॉइस चेअरमन बाळासाहेब नागवडे,पं स.सभापती सुभाष उमाप, पं.स.उपसभापती मोनिका हरगुडे,बाजार समितीचे संचालक, विजेंद्र गद्रे, बंडु जाधव, सतीश कोळपे,  घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष कळसकर, जि.प.सदस्य राजेंद्र जगदाळे, कुसुमताई मांढरे, सविता बगाटे, कारखान्याचे संचालक बाबासाहेब फराटे, नरेंद्र माने, गोविंद निंबाळकर,उत्तम सोनवणे, पं.स.सदस्य सविता प-हाड,शहराध्यक्ष जाकिरखान पठाण, युवक शहराध्यक्ष रंजन झांबरे, कलिम सय्यद, निलेश पवार, मोहित साकला,हफिज बागवान,अक्षय सोनवणे, पिडीसीसी संचालिका डॉ.वर्षा शिवले,विद्या भुजबळ,शहराध्यक्ष पल्लवी शहा,युवतीच्या संगिता  शेवाळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निलेश खाबिया, तुकाराम खोले, संतोष शितोळे, युवकचे तालुकाध्यक्ष कुंडलिक शितोळे, प्रकाश दुर्गे, भरत काळे, पंडित दरेकर आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या