शिरुर नगरपालिकेच्या सभेत रंगला अभुतपुर्व गदारोळ

शिरुर,ता.७ डिसेंबर २०१७ (अभिजित आंबेकर) : शिरुर नगरपालिकेत तहकुब झालेली सभा मंगळवार(दि.५) रोजी पार पडली.माञ सभागृहात विरोधी पक्षनेते मंगेश खांडरे व सत्ताधारी नगरसेवक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.सभागृहात या शाब्दिक चकमकीमुळे काही काळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता.परंतु तणाव निवाळण्यास सत्ताधारी गटास यश मिळाले.

शिरुर येथील नगरपालिकेमध्ये गणसंख्येअभावी या पुर्वी घेण्यात आलेली सभा तहकुब झाली होती.यानंतर विरोधी गटातील  नगरसेवक मंगेश खांडरे यांनी केलेले विविध आरोप व उर्दु शाळा पाडण्याचा विषय हा चांगलाच गाजला होता.त्यानंतर सत्ताधारी गटाकडुन पञकार परिषद घेउन याबाबत सविस्तर खुलासा करण्यात आला होता.त्यामुळे मंगळवारी होणा-या सर्वसाधारण सभेकडे शहरातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले होते.या पार्श्वभुमीवर ही सभा वादळी ठरती काय या बाबत तर्क-वितर्कांना उधान आले होते.

मंगळवारी नगरपालिकेच्या सभागृहात तहकुब झालेली सभा पुन्हा घेण्यात आली.यावेळी सभेच्या प्रारंभी मागील सभेचा वृतांत वाचण्या अगोदरच विरोधी पक्षनेते मंगेश खांडरे यांनी मागील सभेत अनधिकृत बांधकाम, बेकायदेशीर परवानग्या तसेच बांधकाम ठेकेदारांनी केलेली चुकीची कामे यांची चौकशी व्हावी हे विषय उपस्थित केले होते.त्यावेळेस नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी या संदर्भात पाच नगरसेवकांची सदस्यीय समिती गठित करुन त्याचा अहवाल दहा दिवसांत सादर करावा असा आदेश दिला होता.या बैठकिच्या सुरुवातीला तो अहवाल सभागृहाला सादर करावा अशी जोरदार मागणी सभेच्या प्रारंभी केली.माञ तसा कुठलाही अधिकार या समितीला नसुन कुठलाही अहवाल कायदेशीर अडचणीमुळे देता येत नसल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.यावेळी माञ खांडरे यांनी समिती तुम्हीच नेमता, समिती नेमण्याचे अधिकार सभागृहाला नसल्याचेही तुम्हीच सांगता व भ्रष्टाचारी लोकांना तुम्हीच पाठीशी घालता असा घणाघाती आरोप करताच सभागृहात एकच गोंधळ उडाला.खांडरे यांच्या या वक्तव्याचा विरोध करत नगरसेवक संजय देशमुख, विनोद भालेराव, विठ्ठल पवार, मुजफ्फर कुरेशी यांनी कडाडुन विरोध करत एकाच  नगरसेवकाला एवढा वेळ देवु नये अजेंड्यावरील विषय घ्यावेत  तसेच कुठल्याही भ्रष्टाचारी ठेकेदाराला पाठीशी घालायचा प्रश्नच नसुन तसे सिद्ध करावे अन्यथा आरोप खपवुन घेणार नाही असे म्हणाले. यानंतर सुद्धा मंगेश खांडरे यांनी आपली बाजु लावुन धरत अहवाल सादरच करावा अन्यथा कामकाज चालु देणार नाही अशी भुमिका घेतल्याने सभागृहात अभुतपुर्व गोंधळ उडाला.सत्ताधारी नगसेवकांकडुन खांडरे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत त्यांना शांत करण्यासाठी प्रयत्न सुरु केला.तर या अभुतपुर्व गोंधळात भाजपचे नगरसेवक नितीन पाचर्णे यांनी, खांडरे यांना त्यांचे काय म्हणने असेल ते मांडु द्या  गोंधळात कोणतेही कामकाज होणार नाही असे म्हणत सत्ताधारी नगरसेवकांना विनंती केली.खांडरे यांनी संपुर्ण बाजु मांडताच नगरसेवक विजय दुगड यांनी सांमज्यस्याची भुमिका घेत नगपालिका कायद्यात चौकशी समिती नेमण्याचा कुठलाही अधिकार नसल्याने आमच्याकडे यासंदर्भात कोणताही अहवाल सादर करण्यात आला नाही.असे सांगत भ्रष्टाचारी कर्मचारी व ठेकेदाराला पाठिशी घालण्याचा प्रश्नच येत नसल्याचा निर्वाळा करत खांडरे यांना शांत केले.

यानंतर सभागृहात मागील सभेतील विषयांचे वाचन करण्यात आले.उर्दु शाळा हि शहरातील ऐतिहासिक व एकमेव उर्दु शाळा असल्याने त्यामुळे त्याच ठिकाणी शाळेसाठी सुसज्ज इमारत उभारावी अशी मागणी खांडरे यांनी विषयाच्या सुरुवातीलाच केली.या नंतर नगरसेवक विजय दुगड, पाणीपुरवठा सभापती मुजफ्फर कुरेशी यांनी या विषयाला विरोध कोणाचाच नसुन आहे त्याच जागेवर सुसज्ज व अद्ययावत दुमजली इमारत उभारण्यासाठी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या वेळी नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी दुगड यांच्या सुचनेला अनुमोदन दिले.या सभेला मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, शिक्षण मंडळाच्या रोहिणी बनकर, बांधकाम समितीच्या उज्जवला बरमेचा, ज्योती लोखंडे, मनिषा कालेवार, पुजा जाधव, रेश्मा लोखंडे, संगिता  मल्लाव,अंजली थोरात, सुनिता कुरंदळे, सुरेखा शितोळे, उज्जवला वारे, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती सचिन धाडिवाल, संदिप गायकवाड, अभिजित पाचर्णे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या