शिरुरला जनावरांच्या बाजारात पशुपालकांची गर्दी

शिरुर,ता.८ डिसेंबर २०१७ (प्रतिनीधी) : शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी भरलेल्या जनावरांच्या बाजारात सुमारे 200 ते 250 जनावरांची आवक होऊन सुमारे50 ते 60 लाख रूपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती सभापती शशिकांत दसगुडे यांनी दिली.

गुरुवारी (ता.७) रोजी भरवलेल्या जनावरांच्या बाजारात काष्टी, घोडेगांव, राहुरी, लोणी प्रवरा, कान्हुर मेसाई, मोटेवाडी, केडगांव, इनामगांव येथील अनेक व्यापारी व शिरूर परिसरातील अनेक शेतकरी आपली जनावरे घेऊन विक्रीसाठी आलेले होते.
शिरूर तालुका हा बागायती असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे. दुध व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर तरूण वळु लागलेले आहेत.जनावरांचा बाजार शिरूर येथे सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत आनंदी असुन शिरूर परिसरातील शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सर्व संचालक मंडळाचे आभार मानले. शिरूर परिसरात अनेक दुध उत्पादक शेतकरी असुन त्यांना या बाजारचा चांगला उपयोग होताना दिसत आहे. शेतकरी वर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय हाताळल्यामुळे त्यांचे उत्पन्नात वाढ होणार असुन खर्चात बचत होत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.

शिरूर येथील जनावर बाजारमध्ये मोठ्या प्रमाणावर गिऱ्हाईक असल्यामुळे व चांगला दर मिळत असल्यामुळे व्यापारी देखील खुष आहे. जनावर बाजारमध्ये दिवसभरात बाजारसमितीच्या कर्मचा-यांनी शेतकरी व्यापारी यांच्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्याने सर्वांनी कर्मचा-यांनाही धन्यवाद दिले.उपसभापती विश्वासकाका ढमढेरे, सचिव दिलीपराव मैड व सर्व संचालक मंडळ जनावर बाजार मध्ये शेतकरी, व्यापारी, खरेदीदार यांना जास्तीत जास्त सुविधा देता येतील याबद्दल लक्ष ठेवुन आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या