शिरुरला पाचशे रुपयांची लाच घेताना भुकरमापक जाळ्यात

शिरुर,ता.१२ डिसेंबर २०१७ (प्रतिनीधी) : शिरुर येथील भुमिअभिलेख कार्यालयातील भुकरमापकास पाचशे रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.या वृत्ताने परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी संदिप विठ्ठल रोडे (वय.३९) असे लाचखोर अधिका-याचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी कि, यातील तक्रारदार यांनी त्यांच्या भाउहिस्सेवारी ची नोंद करण्यासाठी शिरुर येथील भुमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता.सदरचा अर्ज भुमिअभिलेख कार्यालयाकडुन निकाली काढला होता. सदर निकाली काढलेल्या अर्जाची प्रत रेकॉर्डरुम मधुन काढुन देण्यासाठी भुकरमापक रोडे याने तक्रारदार यांच्याकडे पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खातरजमा करुन शिरुर येथील कार्यालयात सोमवारी(ता.११) रोजी सापळा रचला होता. यावेळी रचलेल्या सापळ्यात भुमिअभिलेख कार्यालयात ५०० रुपयाची लाच स्विकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रोडे यास रंगेहाथ पकडले.
शासकिय कार्यालयात लोकसेवक जर लाचेची मागणी करत असेल तर पुणे येथील लाचलुपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे.

शिरुर तालुक्यात भुकरमापकास लाच स्विकारताना रंगेहाथ पकडल्याने शिरुर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.या पुर्वी महसुल तसेच अन्य विभागाच्या कर्मचा-यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.शिरुर तालुक्यात जमिनीला आलेला सोन्याचा भाव यामुळे येथील शासकिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांना त्यामुळे तोंडाला पाणी सुटले असुन अनेक कर्मचारी, अधिकारी हे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकत आहे.

शिरुर तालुक्याचे संकेतस्थळ www.shirurtaluka.com ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करुन आवाज उठविला होता.तसेच शिरुर तालुक्यातील अधिका-यांचे असणारे लांगेबांधे व आजपर्यंतची कारवाई ची माहितीही सविस्तर प्रसिद्ध केली होती.त्यामुळे शिरुर तालुक्यातील  नागरिकांमध्ये जनजागृती होत  असल्याचे दिसुन येत असुन या पुढे लाचखोरीला आळा बसेल का  असाही सवाल नागरिकांमधुन व्यक्त होत आहे.

लाचखोरीला तालुक्यातील जनता वैतागली

शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी पैसे दिल्याशिवाय कामेच होत नसल्याच्या असंख्य नागरिकांच्या तक्रारी असुन लाचलुचपत विभागाची शिरुर तालुक्यावर करडी नजर आहे.त्यामुळे आता पुढील सावज कोण असणार हेही सांगणे उचित ठरणार नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या